For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दगडाला शेंदूर फासून देव केला...आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही; भुजबळांची जरांगेवर घणाघाती टिका

04:19 PM Nov 17, 2023 IST | Abhijeet Khandekar
दगडाला शेंदूर फासून देव केला   आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही  भुजबळांची जरांगेवर घणाघाती टिका
Advertisement

मराठा समाजाचा नविन नेता निर्माण झाला असून तो आम्ही त्यांच्या हक्काचे खातो असं म्हणतोय. अरे आम्ही तुझे खातो नसून दगडाला शेंदूर लावल्याने नविन देव निर्माण करण्यात आला आहे. असा घणाघाती आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच धनगर, तेली, माळी यांना नंतर ओबीसीमध्ये धुसवले असे म्हणणाऱ्यांनी आरक्षण म्हणजे काय हे आधी समजावून घेतले पाहीजे अशीही परखड टिका छगन भुजबळ यांनी केली आहे.

Advertisement

जालना येथे ओबीसी समाजाचा एल्गार सभा संपन्न होत आहे. या सभेला राज्यातील ओबीसी समाजाचे सर्वपक्षीय नेते हजर आहेत. या व्यासपीठावरून बोलताना महाराष्ट्राचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले, "मंडल आयोगाच्या अभ्यासानुसार देशात 54 टक्के ओबीसी असल्याने त्यांना 27 टक्के आरक्षणा द्यावेच लागेल असे सांगीतले होते. मंडल आयोगाना ही शिफारस देशभर फिरून अभ्यास करून सुचवला होता. केंद्रात ओबीसींना तत्कालीन व्ही. पी. सिंग यांनी तर महाराष्ट्रात शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून आरक्षण दिले होते." असा खुलासा त्यांनी केला.

मनोज जरांगे पाटलांवर थेट आरोप करताना भुजबळ म्हणाले, "कोणाचं खाता ? असं सारखा प्रश्न विचारला जातो. आम्ही तुझे खात नाह. भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी आम्ही तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते आधी समजून घ्या! आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून तुम्हाला कोणता देव करायचा आहे ?" अशी घणाघाती टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.