महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यात सीईटी परीक्षा सुरळीत

10:41 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

550 विद्यार्थ्यांची दांडी : अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांमुळे नाराजी, 504 विद्यार्थी कन्नड परीक्षा देणार

Advertisement

बेळगाव : अभियांत्रिकी, पॅरामेडिकल यासह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या के-सीईटी परीक्षेला शुक्रवारी 550 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. शुक्रवारी सकाळच्या सत्रात फिजिक्स तर दुपारच्या सत्रात केमिस्ट्री विषयांचे पेपर पार पडले. बेळगाव व बैलहोंगल येथील 21 परीक्षा केंद्रांवर सुरळीत पद्धतीने परीक्षा पार पडली. के-सीईटी परीक्षेला गुरुवार दि. 18 पासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी गणित व बायोलॉजी विषयाचा पेपर झाला. तर शुक्रवारी फिजिक्स व केमिस्ट्री विषयांचे पेपर पार पडले. 8761 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केईएकडे नोंदणी केली होती. त्यापैकी 8211 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 550 विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे पदवीपूर्व परीक्षा विभागाने कळविले आहे.

Advertisement

कन्नडसाठी आज परीक्षा

परराज्यातील विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी कर्नाटकात येतात. अशा विद्यार्थ्यांना सीईटीसोबत कन्नड विषयाची परीक्षा द्यावी लागते. शनिवार दि. 20 रोजी कन्नड विषयासाठीचा पेपर लिंगराज कॉलेज परीक्षा केंद्रावर घेतला जाणार आहे. महाराष्ट्र, गोवा तसेच इतर राज्यातील विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. लिंगराज कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर 504 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न...

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेली प्रवेश परीक्षा के-सीईटीला गुरुवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी गणित व बायोलॉजी विषयाचे पेपर झाले. यापैकी गणित विषयातील 17 तर बायोलॉजी प्रश्नपत्रिकेतील 10 प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील देण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थीही संभ्रमात पडले होते. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात केईएने विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्याचे आवाहन केले आहे. हरकती आल्यास या प्रश्नांबाबत फेरविचार केला जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article