For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेर्लेमध्ये १५७ महिला शेतकऱ्यांना दाखले वाटप

वेर्लेमध्ये १५७ महिला शेतकऱ्यांना दाखले वाटप
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील हे शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक गावागावात जाऊन देत आहेत. वेर्ले येथे महिला शेतकरी दाखले वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी १५७ महिला शेतकऱ्यांना दाखले वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Advertisement

यावेळी प्रमोद नाईक यांनी कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले होते. वेर्ले ग्रामपंचायत कार्यालय येथे महिला शेतकरी सक्षमीकरण अंतर्गत महिला शेतकरी दाखले वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी भारती गोरे, सरपंच रुचिता राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, ग्राम महसूल अधिकारी प्रवीण पोले, पोलीस पाटील प्रियांका सावंत, ग्रामपंचायत अधिकारी राजेश ठाकूर, प्रमोद नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ घ्या. त्याचबरोबर आता सातबारावर तुमच्या पतीचे नाव असेल, तर त्या ठिकाणी पत्नीचेही नाव लावून दिले जाणार आहे. त्याचाही लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.