For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किणये महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा सोहळा भक्तीमय वातावरणात

11:40 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
किणये महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा सोहळा भक्तीमय वातावरणात
Advertisement

लक्षणीय कलश मिरवणूक : पंचक्रोशीतील अनेक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Advertisement

वार्ताहर/किणये 

किणये गावातील जागृत महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यानिमित्त गावात दिवसभर कडक वार पाळणूक करण्यात आली होती. सकाळी मंदिरात टाळ मृदंगाच्या गजरात काकड आरती झाली. त्यानंतर अभिषेक व पूजा करण्यात आली. दर्शनासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शुक्रवारी सकाळी गावात पारंपरिक वाद्यांच्या गजरात कलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला डोक्मयावर कलश घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मिरवणुकीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. यावेळी गावातील सर्व देवदेवतांची पूजा-अर्चा करण्यात आली. मिरवणूक सुरू असताना वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात विविध अभंग म्हटले. तसेच महालक्ष्मी देवीचा जयघोष करण्यात आला. यामुळे अवघी किणये नगरी दुमदुमली होती.

Advertisement

महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याच्या या सोहळ्यानिमित्त गावात पाच दिवस वार पाळणूक करण्यात आली होती. यातील पहिला दिवस म्हणजे दि. 4 रोजी गावातील सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवून, वार पाळणूक केली होती. तसेच गावातून कोणीही नोकरी, कामाला गेले नव्हते. तर बाहेरील लोकांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली होती. दि. 4 रोजीचा हा कडक वार पाळणूक करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत देवीचे पूजन करून ओटी भरण्यात आली. त्यानंतर सर्व भक्तांनी देवीची ओटी भरली. देवीच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात भजन व इतर कार्यक्रम झाले. या सोहळ्यासाठी गावातील पंचमंडळी व तऊण कार्यकर्ते विशेष परिश्र्रम घेताना दिसत होते. रात्री जागर भजनाचा कार्यक्रम झाला.

Advertisement
Tags :

.