सीईओ शर्मांकडून पेटीएमबाबतच्या शंकांचे निरसन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पेटीएमवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) कडक निर्बंधानंतर पेटीएम वापरकर्ते संभ्रमात आहेत. पेटीएमबद्दल येत असलेल्या विविध बातम्यांदरम्यान, वन97 कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विजय शेखर शर्मा यांनी शुक्रवारी एक निवेदन जारी केले आहे.
कंपनीचे सीईओ म्हणाले की डिजिटल पेमेंट आणि सेवा अ प पेटीएम कार्यरत आहे आणि 29 फेब्रुवारीनंतरही ते नेहमीप्रमाणे काम करत राहील.त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्ट केले की कंपनी पूर्ण पालन करून देशाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहे. शर्मा म्हणाले, जे पेटीएम वापरतात त्या सर्वांना... तुमचे आवडते अॅप कार्यरत आहे आणि 29 फेब्रुवारीनंतरही काम करत राहील.
सीईओ म्हणाले, ‘पेटीएम टीमच्या प्रत्येक सदस्यासोबत, तुमच्या सतत समर्थनासाठी मी तुम्हाला सलाम करतो. प्रत्येक आव्हानाला एक उपाय आहे आणि आम्ही पूर्ण पालन करून आमच्या देशाची सेवा करण्यासाठी प्रामाणिकपणे वचनबद्ध आहोत. पेटीएमचे योगदान सर्वात जास्त आहे.
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये वन97 कम्युनिकेशनची 49 टक्के हिस्सेदारी आहे परंतु ती त्याची सहयोगी कंपनी म्हणून वर्गीकृत करते, सहायक कंपनी म्हणून नाही.
रिझर्व्ह बँकेने कायसूचना दिल्या होत्या?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारू नयेत असे निर्देश दिले आहेत.