For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘टेलिग्राम’वरील बंदीनंतर सीईओ पावेलही चर्चेत

06:01 AM Jun 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘टेलिग्राम’वरील बंदीनंतर सीईओ पावेलही चर्चेत
Advertisement

नीट पेपरफुटीनंतर, भारताची टेलिग्राम या मेसेजिंग अॅपवर आठवड्यासाठी बंदी

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नीट पेपरफुटीनंतर, भारत सरकारने टेलिग्राम या मेसेजिंग अॅपवर एका आठवड्यासाठी बंदी घातली आहे. यावर टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव्ह यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. चला जाणून घेऊया टेलिग्रामचे सीईओ कोण आहेत आणि त्यांनी टेलिग्राम हे मेसेजिंग अॅप कधी सुरू केले?

Advertisement

टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव्ह यांची यशोगाथा

नीट पेपरफुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती, त्यानंतर 21 जून 2026 रोजी होणाऱ्या नीट परीक्षेच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने टेलिग्राम या मेसेजिंग अॅपवर एका आठवड्यासाठी (22 जूनपर्यंत) बंदी घातली आहे. या बंदीनंतर, टेलिग्रामचे सह-संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव्ह यांनी केवळ या निर्णयावर तीव्र प्रतिक्रियाच दिली नाही, तर यामागे व्हॉट्सअॅप आणि रिलायन्सचा हात असल्याचा आरोपही केला.

सीईओ पावेल डुरोव्ह चर्चेत

पावेल डुरोव्ह यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1984 रोजी रशियामध्ये झाला. त्यांचे नाव अनेकदा वादात सापडले आहे. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांनी आपला भाऊ निकोलाई डुरोव्ह याच्यासोबत ‘व्हीके’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्थापना केली. जे रशियामधील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले. फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहून त्यांनी हे प्लॅटफॉर्म सुरू केले. यानंतर लोक त्यांना रशियाचा मार्क झुकरबर्ग या नावानेही संबोधू लागले.

पावेल डुरोव्ह यांना कंपनी सोडावी लागली

2010-11 साली जेव्हा रशियामध्ये निवडणुका सुरू होत्या, तेव्हा रशियन सरकारने त्यांना ‘व्हीके’वरील विरोधी पक्षांची खाती ब्लॉक करण्यास सांगितले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या वापरकर्त्यांच्या डेटाची मागणी केली होती. पण त्यांनी सरकारच्या आदेशांचे पालन केले आणि सरकारला साथ दिली. यानंतर त्याला कंपनी सोडण्यास भाग पाडले गेले. एवढेच नाही तर त्याने रशियादेखील सोडले.

टेलिग्राम कधी आणि कसे सुरू झाले?

2013 मध्ये, पावेल डुरोव्हने आपल्या भावासोबत टेलिग्राम सुरू केले. त्याच्या एंड-टू-एंड एक्रिप्शन तंत्रज्ञान, गोपनीयता आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे, हे मेसेजिंग अॅप भारतासह अनेक देशांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. पावेल डुरोव्ह दुबईमध्ये राहतात आणि ते टेलिग्रामचे मुख्यालय आहे.

Advertisement
Tags :

.