For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिरची, वालपापडी, मटार व ढबूचे शतक

12:05 PM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
मिरची  वालपापडी  मटार व ढबूचे शतक
Advertisement

वाढलेल्या भाज्यांच्या दरामुळे नागरिक त्रस्त : आल्याच्या दरात वाढ, लसूण मात्र स्थिर

Advertisement

पणजी : पणजी बाजारपेठेत मिरची, वालपापडी, मटार व ढबूने शतक गाठले असून, 100 ऊपये प्रतिकिलो दराने या भाज्या विकल्या जात आहेत. राज्यात उष्मा वाढत असल्याने याचा फटका या भाज्यांच्या दरावर जाणवत आहे. भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. गेल्या आठवड्याप्रमाणे लसूणाचे दर पणजी बाजारपेठेत स्थिर असून 200 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. गेल्या आठवड्यात आले 160 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जात होते. त्यात 40 ऊपयांनी वाढ झाली आसून 200 ऊपये प्रतिकिलो दराने सद्या विकले जात आहे. फलोत्पादन महामंडळाच्या दुकानावर आले 160 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जाते तर लसूण 170 ऊपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. खुल्या बाजारापेक्षा किंचित कमी दराने फलोत्पादन महामंडळाच्या दुकानावर भाज्यांची विक्री होत आहे. कांद्यांच्या दरात गेल्या आठवड्यापेक्षा 5 ऊपयांनी वाढ झाली असून 40 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जात होते. गेल्या आठवड्यात 35 ऊपये प्रतिकिलो दरात या कांद्यांची विक्री होत होती. देशात कांदा निर्यातबंदी लागू झाल्याने कांद्याचे दर कमी झाले होते. परंतु पुन्हा कांद्याचे दर वाढत आहे. गेल्या आठवड्यात टॉमेटो 40 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जात होते. त्यात 10 ऊपयांची घसरण झाली असून सद्या 30 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. बटाट्यांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर असून 40 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.

अन्य भाज्यांचे दर चढेच

Advertisement

पणजी बाजारपेठेतील इतर भाज्यांचे दरही चढेच आहेत. फ्लॉवर 30 ऊपये, कोबी 40 ऊपये, गाजर 60 ऊपये प्रतिकिलो, भेंडी 60 ऊपये प्रतिकिलो, चिटकी 60 ऊपये प्रतिकिलो, वांगी 60 ऊपये प्रतिकिलो, दोडकी 80 ऊपये प्रतिकिलो अशा दराने विकल्या जात आहे.

गावठी भाज्यांना वाढती मागणी

खुल्या बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने स्थानिक भागांतून येणाऱ्या गावठी भाज्यांची खरेदी करताना ग्राहक दिसत आहे.  लाल भाजी 20 ऊपयांना दोन जुडी, मुळा 20 ऊपये जुडी, गावठी वांगी 30 ते 40 ऊपये, वाल 20 ऊपये जुडी, तोंडली 20 ऊपये वाटा, भाजीची कच्ची केळी 50 ऊपयांना 4 अशा दरात या गावठी भांज्या विकल्या जात आहे.

निरफणस 300 ते 350 ऊपयांना...

पणजी बाजारपेठेत निरफणसाची आवक वाढली असून, 300 ते 350 ऊपयांना एक निरफणस विकला जात आहे. निरफणस हा ठराविक हंगामात मिळतो. त्यामुळे लोकांकडून निरफणाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. निरफणसाचे दर वाढलेले असले तरी ग्राहकांकडून निरफणासची खरेदी करण्यात येत आहे.

लिंबू, कलिंगड, शहाळ्यांची वाढली मागणी...

राज्यात मागील काही दिवसांपासून उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. उकाडा वाढू लागल्याने उष्म्यापासून गारवा मिळावा यासाठी नागरिकांकडून लिंबू पाणी, सरबत, फळांच्या रसाचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे लिंबू, शहाळे आणि कलिंगडाला मागणी वाढली आहे. पणजी बाजारपेठेत लिंबू 8 ते 10 ऊपयांना एक तर 50 ऊपयांना 5 ते 6 लिंबू विकले जात आहे. कलिंगड 25 ऊपये किलो तर शहाळे 50 ऊपयांना एक विकले जात आहे.

Advertisement
Tags :

.