For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिलक वर्मा, प्रथम यांची शतके

06:51 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिलक वर्मा  प्रथम यांची शतके
Advertisement

वृत्तसंस्था /अनंतपूर

Advertisement

2014 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यातील शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी इंडिया अ संघाने आपल्या दुसऱ्या डाव 3 बाद 380 धावांवर घोषित केला. तिलक वर्मा आणि प्रथमसिंग यांनी शानदार शतके झळकविली. आता इंडिया अ संघाने इंडिया ड संघाला निर्णायक विजयासाठी 488 धावांची कठीण आव्हान दिले. दिवसअखेर इंडिया ड ने दुसऱ्या डावात 1 बाद 62 धावा जमविल्या.

इंडिया अ संघाने पहिल्या डावात 290 धावा जमविल्यानंतर इंडिया ड चा पहिला डाव 183 धावांत आटोपला. इंडिया अ संघाने 107 धावांची आघाडी घेतली. इंडिया अ च्या दुसऱ्या डावामध्ये तिलक वर्माने 193 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 111 तर प्रतम सिंगने 189 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 122 धावा झळकविल्या. उपाहारावेळी इंडिया अ ने दुसऱ्या डावात 2 बाद 260 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी इंडिया अ ने 1 बाद 115 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला होता. रियान पराग 20 धावांवर बाद झाला. रावतने 88 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 64 धावा जमविताना तिलक वर्मासमवेत चौथ्या गड्यासाठी अभेद्य 116 धावांची भागिदारी केली. चहापानावेळी इंडिया अ ने 3 बाद 370 धावांपर्यंत मजल मारली होती. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये इंडिया अ ने आपला दुसरा डाव घोषित केला. त्यानंतर इंडिया ड ने दिवसअखेर 19 षटकात 1 बाद 62 धावा जमविल्या. सलामीचा तायडे लवकर बाद झाला. रिकी भुई 44 धावांवर खेळत आहे.

Advertisement

संक्षिप्त धावफलक : इंडिया अ प. डाव 290, इंडिया ड प. डाव सर्वबाद 183, इंडिया अ दु. डाव 98 षटकात 3 बाद 380 डाव घोषित (प्रथमसिंग 122, तिलक वर्मा नाबाद 111, रावत नाबाद 64), इंडिया ड दु. डाव 19 षटकात 1 बाद 62.

Advertisement
Tags :

.