For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहन भागवत यांना आता ‘एएसएल’ सुरक्षा

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोहन भागवत यांना आता ‘एएसएल’ सुरक्षा
Advertisement

नरेंद्र मोदी, अमित शहांप्रमाणेच सर्वोच्च दर्जाचे सुरक्षाकवच

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत आता आणखी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी त्यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, परंतु आता ती प्रगत सुरक्षा संपर्क म्हणजेच अॅडव्हान्स सिक्युरिटी लायझॉन (एएसएल) पद्धतीत अपडेट करण्यात आली आहे. देशातील अतिमहनीय व्यक्तींना ‘एएसएल’ सुरक्षा मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना मिळणारी सुरक्षाही ‘एएसएल’ दर्जाची आहे.

Advertisement

सुरक्षेच्यादृष्टीने मोठा धोका असलेल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींना ‘एएसएल’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली जाते. काही दिवसांपूर्वी इंटेलिजन्स ब्युरोला सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबाबत धमकीचा इशारा मिळाला होता. यानंतर मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता आता मोहन भागवत कोणत्याही सामान्य हेलिकॉप्टरने प्रवास करणार नसून, खास तयार केलेल्या हेलिकॉप्टरनेच प्रवास करतील. याशिवाय मोहन भागवत जिथे जातील, तिथे ते दाखल होण्यापूर्वी त्या ठिकाणाचा सुरक्षा आढावा घेतला जाईल. तसेच सुरक्षेची तालीमही केली जाईल. याशिवाय त्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागासह स्थानिक यंत्रणाही तैनात करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.