महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

स्मार्ट सिटी-2.0 संदर्भात केंद्रीय पथक दाखल

11:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्ली येथून आलेल्या पथकाने मनपाच्या विविध प्रकल्पांना दिली भेट :  शहराच्या विकासासाठी 135 कोटी रुपयांचा निधी

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी-2.0 मध्ये समावेश झाला आहे. या योजनेंतर्गत शहराच्या विकासासाठी 135 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या योजनेसंदर्भातील माहिती देण्यासाठी व सध्या महानगरपालिकेने राबविलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे पथक बेळगावात दाखल झाले असून त्यांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापक संचालिका सहिदा अफ्रीन बानू बेळ्ळारी व मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी या पथकाला विविध योजनांची माहिती दिली.

Advertisement

अशोकनगर येथील फुल मार्केटमध्ये असलेल्या अगरबत्ती प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर खासबाग टीचर कॉलनी येथील कचरा प्रकल्प, आझमनगर येथील इंदिरा कॅन्टीनजवळील बायोगॅस प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर तुरमुरी येथे कचरा प्रकल्पाला भेट देऊन संपूर्ण माहिती या पथकाने घेतली आहे. कचऱ्याची विल्हेवाट कशाप्रकारे सध्या लावण्यात येत आहे, तसेच भविष्यात त्यामध्ये कशाप्रकारे सुधारणा करता येणार आहे, याबाबत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे प्रोजेक्ट संचालक नईम किरुवाला यांनी सांगितले. स्मार्ट सिटी-2.0 मध्ये समावेश झाल्यानंतर आता या योजनेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात येणार आहे. दिल्ली येथून आलेल्या केंद्रीय पथकाने गुरुवारी दिवसभर विविध ठिकाणी भेटी देऊन संपूर्ण माहिती घेतली. या दुसऱ्या टप्प्यातील योजनेमध्ये विशेषकरून शहर स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी अधिक काळजी घेण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न केले जाणार असल्याचे केंद्रीय पथकाने सांगितले.

काही सुधारणा करण्याची सूचना

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन प्रकल्प राबविणे महत्त्वाचे आहे. सध्या काही ठिकाणी प्रकल्प राबविण्यात आले तरी भविष्याचा विचार करून त्यापेक्षा मोठे प्रकल्प राबविण्याबाबत नियोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. केंद्रीय पथकाने महानगरपालिकेने राबविलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी केली. त्यामध्ये काही सुधारणा करण्याची सूचना केली. तसेच सध्या जे प्रकल्प राबविण्यात आले आहेत त्याबद्दल महानगरपालिकेचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी पर्यावरण विभागाचे अभियंते हणमंत कलादगी, अभियंते आदिलखान पठाण, नगरसेवक अॅड. हणमंत कोंगाली यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article