केंद्र सरकारकडून आवश्यक मदत देण्यास कटिबद्ध : एच. डी. कुमारस्वामी
बेंगळूर : कल्याण कर्नाटक भागातील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक मदत करण्यास कटिबद्ध आहे. या संदर्भात केंद्र सरकार कर्नाटकच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. सोशल नेटवर्किंग साईट ‘एक्स’वर ट्विट करत ते म्हणाले, केंद्र सरकार आपल्या लोकांच्या कल्याणाची आणि त्यांच्या सुरक्षित उपजीविकेची काळजी घेऊन सर्वतोपरी सहकार्य करेल, याची केंद्रीय मंत्री म्हणून मी तुम्हाला खात्री देतो, असे त्यांनी सांगितले. कल्याण कर्नाटकातील कलबुर्गी, विजापूर, बिदर, रायचूर, यादगीर, कोप्पळसह विविध जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरामुळे नागरिक संकटात सापडले आहेत. या कठीण काळात सर्वांचे जीव वाचवणे आणि आवश्यक सुविधा पुरवणे हे राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असणे गरजेचे आहे. प्रत्येक पूरग्रस्त तालुक्मयात निवारा केंद्रे स्थापन करून सर्व आपत्कालीन सुविधा लोकांना सहज उपलब्ध करून द्याव्यात, अशी माझी विनंती आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे.