For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूरहानीच्या पाहणीसाठी केंद्रीय समिती स्थापन

06:06 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
पूरहानीच्या पाहणीसाठी केंद्रीय समिती स्थापन
Advertisement

लवकरच करणार गुजरातचा दौरा : गृह मंत्रालयाने उचलले पाऊल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय गृह मंत्रालयाने अतिवृष्टी आणि पूरामुळे झालेल्या नुकसानाचे आकल करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या कार्यकारी संचालकांच्या नेतृत्वात एक आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक (आयएमसीटी) स्थापन केले आहे. आयएमसीटी लवकरच गुजरातच्या पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.

Advertisement

25-30 ऑगस्टदरम्यान गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थानात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यंदा हिमाचल प्रदेश देखील ढगफुटी, अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या घटनांनी प्रभावित झाले आहे. गृह मंत्रलय या राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून तेथे गंभीर नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यास तेथेही आयएमसीटी पाठविण्यात येणार आहे. याचबरोबर अन्य काही राज्यांमध्येही अतिवृष्टी, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे हानी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार आपत्तीग्रस्त राज्यांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी पूर्णपणे प्रतिबद्ध आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी ऑगस्ट 2019 मध्ये घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंतर्गत गृह मंत्रालय प्रभावित राज्यांकडून निवेदनाची प्रतीक्षा न करता नुकसानीचे आकलन करण्यासाठी आयएमसीटी स्थापन करत असल्याचे केंद्र सरकारकडून म्हटले गेले आहे.

यंदा गृह मंत्रालयाने आयएमसीटींची स्थापना केली असून त्यांनी पूर-भूस्खलन प्रभावित आसाम, केरळ, मिझोरम आणि त्रिपुरामधील हानीचा आढावा घेण्यासाठी निवेदनाची प्रतीक्षा न करतायापूर्वीच दौरे केले आहेत. नागालँडसाठी देखील आयएमसीटी स्थापन करण्यात आली असून ती लवकरच राज्याच्या प्रभावित भागांचा दौरा करणार आहे. तर मागली काळात आयएमसीटी राज्य सरकारकडून निवेदन प्राप्त होताच आपत्तीग्रस्त राज्यांचा दौरा करत होती.

Advertisement
Tags :

.