For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया विमा व्यवसायात उतरणार

07:00 AM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
सेंट्रल बँक ऑफ इंडिया विमा व्यवसायात उतरणार
Advertisement

फ्यूचर जनरलची 24.91 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी  : 451 कोटी रुपयांमध्ये व्यवहार

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही 1911 मध्ये स्थापन झालेली भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. तिचे मुख्यालय मुंबईत आहे आणि ती देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या बँकांपैकी एक आहे.  सेंट्रल बँक ऑफ इंडियाने फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआयसीएल) मध्ये 24.91 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. हा करार 4 जून रोजी संपत आहे. कर्जाच्या ओझ्याने ग्रस्त आणि दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या फ्युचर एंटरप्रायझेस लिमिटेड (एफइएल) कडून मध्यवर्ती बँकेने हिस्सेदारी खरेदी केली. हा करार कर्जदारांच्या समितीने (सीओसी) मंजूर केलेल्या रिझोल्यूशन प्लॅनचा एक भाग आहे, ज्यामध्ये एफइएलचा विमा कंपन्यांमधील हिस्सा विकला गेला आहे.

Advertisement

बीएसईला दिलेल्या माहितीनुसार...

बँकेने एफजीआयआयसीएलमध्ये 451 कोटी रुपयांना 35,06,30,136 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. त्याच वेळी, एफजीआयआयसीएलमध्ये 57 कोटी रुपयांना 65,43,80,439 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. फ्युचर ग्रुपची सुरुवात 2006 मध्ये एक सामान्य विमा कंपनी म्हणून झाली. तिचे मुख्यालय मुंबईत आहे आणि ती वाहन, घर, आरोग्य अशा विविध प्रकारच्या सामान्य विमा उत्पादनांची विक्री करते.

Advertisement
Tags :

.