सेंट्राकेअर जनतेच्या विश्वासास पात्र ठरेल!
अभिनेते नाना पाटेकर यांचे प्रतिपादन : सेंट्राकेअर हॉस्पिटलचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
बेळगाव : अभिनेत्याचे साधेपण आणि त्याचे कार्यकर्तेपण समाजाला भावते. प्रसिद्धीचे वलय मिरवणे शक्य असूनही त्या पलीकडे जाऊन माणूसपण टिकवणे महत्त्वाचे असते. नेमके याचेच प्रत्यंतर नाना पाटेकर यांनी दिले. टिळकवाडी रानडे रोडवरील सेंट्राकेअर हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून त्यांनी जे विचार मांडले ते डॉक्टर आणि समाज या दोन्ही घटकांसाठी महत्त्वाचे ठरले. नाना पाटेकर अत्यंत उत्स्फूर्तपणे बोलले. त्यामध्ये शेतकऱ्यांच्याबद्दलची त्यांची कळकळ व्यक्त झाली. शिवाय वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचा, सुविधांचा लाभ समाजाच्या वंचित घटकांना व्हायला हवा, असे सांगून सेंट्राकेअरच्या संचालक नीता देशपांडे यांच्याकडे त्यांनी रुग्णांबद्दल कायम आपुलकी बाळगावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
समाजाशिवाय माणूस अपुरा आहे. आज सर्वत्र जाती-धर्मावरून भांडणे सुरू आहेत. चित्रपटसृष्टी आणि लष्कर ही दोन क्षेत्रे अशी आहेत जेथे जात-धर्म पाळला जात नाही. शारीरिक व्याधीने माणसे आजारी आहेतच. परंतु, व्याधी नसतानाही माणसांचे आजारपण का वाढत चालले आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यासाठी कार्य करण्याची अपेक्षा त्यांनी डॉक्टरांकडून व्यक्त केली. समाजाची मानसिक सुदृढता महत्त्वाची आहे. तेथे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या बरोबरीनेच संभाजी भिडे गुरुजींनी आजारापासून दूर रहायचे असेल तर सूर्याची उपासना आणि नियमित सूर्यनमस्कार करा, असे सांगितले.
टिळकवाडी परिसरात सेंट्राकेअर नावारूपास येत आहे. या 50 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आपण देत असल्याचे नीता देशपांडे यांनी सांगितले. येथील सुपरस्पेशालिटी सेवांमध्ये कार्डिओलॉजी, कार्डिकोथोरॅसिक सर्जरी, न्युरॉलॉजी, न्युरोसर्जरी, युरॉलॉजी, नेफ्रालॉजी, डायलेसिस, प्लास्टिक सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, जॉईंट रिप्लेसमेंट व स्पाईन सर्जरी यांचा समावेश आहे.
सेंट्राकेअरबद्दल वैद्यकीय संचालक डॉ. नीता देशपांडे म्हणाल्या, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि रुग्णांना प्राधान्य या सूत्राबरोबरच येथे तीन पूर्णपणे सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि 25 खाटांचे इन्टेंसिव्ह केअर युनिट आहे. त्यामुळे गंभीर आणि गुंतागुंतीच्या रुग्णांसाठीसुद्धा येथे उपचार उपलब्ध आहेत. 24/7 आपत्कालीन सेवा, एका फोनवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आणि प्रत्येकाचा वेळ महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन गतीने उपचारास प्रारंभ करणे हे हॉस्पिटलचे वैशिष्ट्या आहे. आधुनिक आरोग्य सेवा देतानाच स्वच्छ आणि रुग्णाला प्रसन्न वाटेल असे वातावरण आम्ही निर्माण करतो, याचा आम्हाला अभिमान आहे.
येथे केवळ आरोग्य सेवा दिली जात नाही तर रुग्णांना परवडतील अशा सुविधा दिल्या जातात. विविध सरकारी आरोग्य योजना, तसेच कॅशलेस विमा करारांमुळे रुग्णांना दिलासा मिळतो. महत्त्वाचे म्हणजे रुग्ण कमीतकमी वेळ हॉस्पिटलमध्ये राहील यावर आमचा कटाक्ष असतो. असे सांगून त्या म्हणाल्या, समाजात गरजू आणि गरीब रुग्णही आहेत. हे लक्षात घेऊन आमच्या के. एच. बेळगावकर फाऊंडेशनद्वारे आम्ही अशा रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर लिडरशीप
सेंट्राकेअरचे वैशिष्ट्या हे आहे की, उपचार करण्यापूर्वी रोग होऊ नये किंवा तो रोखता यावा यावर आमचा विश्वास आहे. म्हणूनच प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर आरोग्याबाबत आमच्याकडे दहाहून अधिक व्यापक असे पॅकेजिस आहेत. आयसीयूमध्ये क्रिटिकल केअर तज्ञ 24 तास उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे लाऊड फिजिशियन हे एका प्रगत टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मद्वारे अधिक सक्षम केले आहेत. जेव्हा रुग्णाला गरज भासेल तेव्हा त्याला हॉस्पिटलमधूनच देशातील त्या त्या शाखेचे तज्ञ सेकंड ओपिनियनसाठी मार्गदर्शन करू शकतात. शिवाय कुटुंबीयांचे समुपदेशनही करू शकतात.
हृदय पुनर्वसन केंद्र
सेंट्राकेअरच्या कार्डियाक रिहॅब युनिटमुळे हृदयविकाराचा झटका, बायपास शस्त्रक्रिया किंवा अँजिओप्लास्टी सारख्या हृदयविकाराच्या घटनांनंतर रुग्णांचा दिनक्रम कसा असावा, हृदयाचे आरोग्य कसे जपावे आणि पुन्हा सक्षम कसे व्हावे, याबद्दलचा खास प्रकल्प येथे कार्यान्वित आहे. याशिवाय यकृत, मूत्रपिंड, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी, तसेच चयापचयाची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी येथे आहारासह अन्य बाबतींबाबत मार्गदर्शन केले जाते. नाना पाटेकर व भिडे गुरुजी यांनी हॉस्पिटलला भेट देऊन तेथील कामकाज जाणून घेतले आणि त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
डॉ. प्रभाकर कोरे यांनीसुद्धा विविध आधुनिक उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्सची संख्या वाढण्याची गरज असून टिळकवाडी परिसरात सेंट्राकेअर सुरू केल्याबद्दल डॉ. नीता देशपांडे यांची प्रशंसा केली. सेंट्राकेअर इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस, ओबेसिटी अॅण्ड मेटाबोलिक हेल्थ मधुमेह आणि लठ्ठपणासाठी सेंट्राकेअरमध्ये व्यापक असे वैद्यकीय व्यवस्थापन आहे. ज्यामुळे रुग्णाची जीवनशैली कशी असावी, हे समजावून दिले जाते. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया आणि डायबेटिस रिव्हर्सल यावर एकाच छताखाली शस्त्रक्रिया केल्या जातात. डॉक्टरांच्या इतकाच आमचा संशोधन विभाग, आमचा सर्व स्टाफ आणि विविध विभागाचे प्रमुख कार्यक्षम आणि रुग्णसेवेसाठी तत्पर असल्याने सेंट्राकेअर इतर हॉस्पिटल्सपेक्षा वेगळे ठरते, असेही त्या म्हणाल्या. या हॉस्पिटलला एनएबीएचकडून नामांकनही मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.