For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शतक महोत्सवी शाळा हे कारिवडे गावचे भूषण

05:57 PM Jan 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
शतक महोत्सवी शाळा हे कारिवडे गावचे भूषण
Advertisement

श्री गावडे काका महाराज यांचे प्रतिपादन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
शतक महोत्सवी शाळा हे कारीवडे गावचे भूषण असून हजारो विद्यार्थी घडवलेल्या शाळेचा शतक महोत्सव ग्रामस्थ एकजुटीने साजरा करीत आहे हे गौरवास्पद आहे. या शाळेच्या शतक महोत्सवाच्या माध्यमातून कारीवडे गावची झालेली एकजूट या शाळेसह गावाच्या सर्वांगीण विकासाकडे नेणारी आहे. गावाच्या विकासासाठी ही एकजूट अशीच कायम ठेवा. असे आवाहन श्री श्री १०८ महंत मठाधिश प पू सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांनी केले.कारिवडे प्राथमिक शाळा नं १ च्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यात गावडे काका महाराज बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँक संचालक महेश सारंग तर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही एम नाईक, सरपंच आरती माळकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, मुंबईस्थित उद्योजक दशरथ पोकळे, माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, माडखोल उपसरपंच जिजी राऊळ, देवस्थान मानकरी दत्ताराम राऊळ, संजय राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश गावकर, उपाध्यक्ष सुहास गावकर, माजी अपर्णा तळवणेकर, लक्ष्मण गावकर, लक्ष्मण सावंत, केंद्र प्रमुख रामचंद्र वालावलकर, बाबु पालव, कमलाकर ठाकूर, कल्याण कदम, भाऊसाहेब गोसावी, डॉ नामदेव गवळी, आनंद तळवणेकर, पोलीस पाटील प्रदीप केळुस्कर, अशोक माळकर, ग्रामपंचायत सदस्य महेश गावकर, साक्षी परब, सेजल कारीवडेकर, मोतीराम गावकर, नारायण भालेकर, भानु सावंत, विठ्ठल परब, इत्तर गोमस आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश गावकर यांनी शतक महोत्सवी वर्षात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महेश सारंग यांनी शाळेच्या नवीन इमारतीसाठी स्थानिक ग्रामस्थानी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. तसेच या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.यावेळी गटविकास अधिकारी व्ही एम नाईक आणि इतर मान्यवरांनी या शतक महोत्सवी शाळेचे कौतुक केले. यावेळी ह भ प कु अनुजा संदीप सावंत आणि सहकारी यांनी सादर केलेल्या सुश्राव्य किर्तनाने उपस्थित मंत्र मुग्ध झाले. त्यानंतर मुलांनी एकापेक्षा अशा सादर केलेल्या विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निकिता पास्ते, सुत्रसंचालन मनोहर परब यानी तर आभार
उमेश चव्हाण यांनी मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.