महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘कसोटी’चा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार

06:37 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुबई, मेलबर्न

Advertisement

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुना फॉरमॅट म्हणजे कसोटी. खेळाडूंची खरी टेस्ट कसोटीच्या फॉरमॅटमध्येच होते. आजही खेळाडूंचे कौशल्य आणि संयम याची कसोटी याच प्रकारात लागते. क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना 1877 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नच्या मैदानावर खेळला गेला. 2027 मध्ये कसोटी क्रिकेटला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ही एकमेव कसोटी मार्च 2027 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवली जा

ईल, असे आयसीसीकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, 2027 हे वर्ष आयसीसीकडून धुमधडाक्यात साजरे केले जाणार आहे.
Advertisement

2027 मध्ये जेव्हा कसोटी क्रिकेटला 150 वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी मेलबर्नच्या मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना आयोजित केला जाणार आहे. कसोटी क्रिकेटच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. मार्च 2027 मध्ये मेलबर्न येथे होणारी 150 वी वर्धापन दिन कसोटी क्रिकेटच्या सर्वोत्तम स्वरूपाचा उत्सव असेल, जो जगातील महान खेळांपैकी एक आहे. आम्ही त्या ऐतिहासिक प्रसंगी इंग्लंडचे यजमानपदासाठी उत्सुक आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी सांगितले.

2027 साल धुमधडाक्यात साजर करणार

मार्च 2027 मध्ये एमसीजी मैदानावर होणारा 150 वा वर्धापन दिन कसोटी सामना हा जगातील महान स्टेडियमपैकी एका स्टेडियमवर होणार आहे. 1977 मध्ये कसोटी क्रिकेटला 100 वर्ष पूर्ण झाली होती, आता 2027 मध्ये 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने आयसीसीकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी एक समिती कार्यरत करण्यात येणार असून या समितीकडे सर्व जबाबदारी असेल. याशिवाय, मेलबर्नमधील हा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणी असेल, असे आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article