Kolhapur : कोडोलीत शतकोत्तर नाताळ उत्सवास भक्तीमय वातावरणात शानदार प्रारंभ
कोडोली चर्च परिसरात जत्रेचे स्वरूप
वारणानगर : सन १९१९ पासून सुरु झालेल्या व ख्रिश्चनांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोडोली ता.पन्हाळा येथे शतकोत्तर नाताळ उत्सवास शानदार प्रारंभ झाला.मुख्य चर्चवर केलेली विद्युत रोषणाई,सकाळ पासून भक्तीगीते,प्रार्थना सभा, मान्यवरांच्या उपस्थितीत विविध भरगच्च कार्यक्रमास लोटलेली अलोट गर्दीने वातावरण भक्तीमय झाले होते.
पन्हाळा तालुक्यातील तसेच कोडोली परिसरातील बाजूच्या खेड्यातील हजारो ख्रिश्चन या उत्सवात सहभागी होतात. येथील नाताळ ऐक्याचे प्रतीक मानला जातो. ख्रिश्चन बांधव अतिशय उत्साहाने येथे नाताळ साजरा करतात. यानिमित्त राजकीय , सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी चर्च मंदिर मध्ये येवून ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. १०६ वर्षा पुर्वी पासून येथे नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. चर्च मंदिर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
गुरुवारी सकाळी १० वाजता रेव्ह एस.आर. रणभिसे व दुपारी एक वाजता रेव्ह आशुतोष आवळे व श्रीनिवास चोपडे हे ख्रिस्त जन्मदिन यांनी विशेष प्रार्थना घेतली.तसेच कॅडल लाईट, लौकिक उपासना, प्रभू भोजन, दिवसभर भाविकांनी दान केलेले कापडे, धान्य, वस्तूंचा लिलाव असे कार्यक्रम पार पडले. यावेळी मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला .
आमदार डॉ विनय कोरे,माजी आमदार सत्यजित पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील,यशवंत शिक्षण समूहाचे सचिव डॉ जयंत पाटील,कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहूल पाटील,कोडोली सरपंच सुनिता बाजीराव केकरे, उपसरपंच डॉ. प्रशांत जमने , यशस्वी फौंडेशनच्या अध्यक्षा विनिता पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चर्च मध्ये येवून शुभेच्छा दिल्या .
चर्च परिसरात खाद्य पदार्थांच्या स्टॉल व मनोरंजनाचे स्टॉल उभारण्यात आले असून कोडोली सह परिसरातील अनेक गावातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याने त येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते .चर्च ट्रस्ट तर्फे ही विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात नाताळ उत्सव निमित्त वृक्षारोपण,वह्या वाटप,रक्तदान शिबिर,रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष एस आर रणभिसे,सेक्रेटरी डॅनियल गायकवाड व शमूवेल गायकवाड यांनी दिली.