सलिब्रिटीकडून पाळीव पाण्यांचे केले जातेय क्लोनिंग
सद्यकाळात अमेरिकेतील मोठमोठे सेलिब्रिटी स्वत:च्या प्रिय श्वान-मांजरांच्या मृत्यूनंतर त्यांना पुन्हा ‘जिवंत’ करवित आहेत. बार्बरा स्ट्रीसँडने स्वत:च्या मांजराचे क्लोन करविले आहे. तर टॉम ब्रेडीने स्वत:च्या श्वानाचे.
क्लोनिंग काय असते
क्लोनिंगचा अर्थ पूर्वीसारखाच नवा प्राणी निर्माण करणे आहे. वैज्ञानिक पाळीव प्राण्याच्या शरीरातून एक छोटाशा टिश्यू मिळवितात, मग त्याला अन्य मादी प्राण्याच्या (सरोगेट माता) शरीरात सोडतात. काही महिन्यांनी काहीसे तसेच दिसणारे पिल्लू जन्माला येते. हे तंत्रज्ञान 1997 मध्ये डॉली या मेंढीद्वारे सुरू झाले होते. आता श्वान, मांजर, अश्व सर्वकाही क्लोन केले जाऊ शकते.

पूर्णपणे नसतो तसा
पाहण्यास 80-90 टक्के एकसारखा वाटतो, परंतु रंग-रुपात फरक असू शकतो. एका रंगबिरंगी मांजराला क्लोन करण्यात आले असता नवे पिल्लू अधिक करड्या रंगाचे निघाले. स्वभाव अत्यंत वेगळा असू शकतो. नवा श्वान शांत आणि प्रेमळ होता, परंतु त्याचा क्लोन भित्रा किंवा आक्रमक असू शकतो. कारण स्वभाव केवळ जीनमुळे नव्हे तर बालपणातील पालनपोषण, आहार, खेळणे, वातावरण या सर्वांनी तयार होत असतो.
क्लोनिंगच्या अनेक समस्या
अत्यंत महाग : एक श्वान क्लोन करण्यासाठी 40-50 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.
यश केवळ 16 टक्के : 100 पैकी 84 वेळा क्लोनिंगचा प्रयत्न अयशस्वी ठरतो.
नवे पिल्लू आजारी राहण्याची शक्यता : हाडं कमजोर, लवकर सांधेदुघी, हृदयाचा विकार होण्याची शक्यता.
मातेला वेदना : हार्मोनचे इंजेक्शन, ऑपरेशन, गर्भपाताचा धोका
जुना आजार : जर जुन्या श्वानाला एखादा आनुवांशिक आजार असेल तर नव्या क्लोनमध्येही तो येणार.
मोठे नैतिक प्रश्न
प्राणी स्वत:चा क्लोन तयार करा किंवा नको असे सांगू शकत नाही. लाखो बेघर श्वान-मांजर आश्रयाच्या शोधात असतात. अशास्थितीत 50 लाख रुपयांमध्ये शेकडो प्राण्यांना नवे जीवन दिले जाऊ शकते. ब्रिटनमध्ये पाळीव प्राण्यांच्या क्लोनिंगवर बंदी आहे. पाळीव प्राणी 10-15 वर्षापर्यंतच जगतात, त्यांच्यासोबत घालविलेला प्रत्येक्षण अनमोल असून क्लोनद्वारे ते आपण पुन्हा मिळवू शकत नाही, केवळ त्यांचा चेहरा आणू शकतो.