भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष शिवाजी चौकात
अवघे शहर रस्त्यावरः आतषबाजी, गुलालाची उधळण
कोल्हापूर
भारतीय क्रिकेट संघाने तब्बल १२ वर्षाने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले आणि छत्रपती शिवाजी चौकात एकाच जल्लोष झाला. रविवारी रात्री भारतीय संघाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या कडकडाट आणी गुलालाची उधळण करतो हजारो युवकांनी भारतीय विजयाचा आनंद साजरा केला.
'दुबई' येथे सुरू असलेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा पराभव केला. याचा विजयोत्सव रविवारी रात्री कोल्हापूर शहरात साजरा करण्यात आला. भारतीय संघाने सामना जिंकताच हजारो युवक दुचाकीसह चारचाकी वाहनांनी शिवाजी चौकाकडे आले. हातामध्ये तिरंगा आणि भगवा झेंडा घेऊन तरुण शिवाजी चौकात दाखल झाले. शिवाजी चौकामध्ये रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास जल्लोषाला प्रारंभ झाला. फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोल ताशांच्या कडकडत विजयी जल्लोष करण्यात आला. दुचाकींचा सायलेंसर काढून फिरवत होते. गुलालाची उधळण करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी क्रिकेट प्रेमींसाठी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती.
घोषणांनी दणाणले शिवाजी चौक
भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी शिवाजी चौक दणाणून गेला. तसेच काही तरुणांनी आपल्या चारचाकी वाहनामध्ये साउंड सिस्टीम लावून विविध गाण्dयांवर ठेका धरला होता.
वाहतूक वळविली
शिवाजी चौकामध्ये जल्लोशासाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. यामुळे शिवाजी चौकाकडे येणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.सीपीआर पासून अवजड आणि चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. शिवाजी चौकाकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. शिवाजी चौकामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
भव्य तिरंगा आणि ...
शिवाजी चौकामध्ये भव्य तिरंगा घेवून काही तरुण सहभागी झाले होते. १०० फूट बाय १२ फुटाचा हा तिरंगा होता. यासह एका तरुणाने आपल्या चारचाकी वाहनाला तिरंगा झेंड्याचा कलर देण्यात आला होता.