Kolhapur News : कोल्हापुरात निकालानंतर गुलाल-भगव्या रंगाची उधळण, शहरात जल्लोष
कोल्हापुरात प्रभागांमध्ये दुचाकी रॅलीतून कार्यकर्त्यांचा जल्लोष
कोल्हापूर : शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिका निकाल जाहीर झाला. निकालानंतर शहरातील ररत्यावर, उमेदवारांच्या कार्यालयाराह प्रभागामध्ये गुलालाबरोबर भगव्या रंगाची उधळण दिवसभर गुरू होती. मिरवणुकीला बंदी असल्याने, प्रभागामध्ये कार्यकर्त्यांनी मात्र दुचाकी रॅली काढून जल्लोष सुरू होता. तर उबाठाच्या एकमेव विजयी उमेदवार प्रज्ञा उतुरे यांनी भव्य अशा ३०० किलोचा हार नगरसेवक बोर्डला लावण्यात आला होता.
सकाळी १० नंतर पोस्टल निकाल जाहीर झाला त्यानंतर कांही निकाल साडेबारानंतर बाहेर पडू लागले. निकालामुळे शहरातील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, गुजरी, धान्यबाजारराह फळ व भाजी मार्केटमध्ये शांतता जाणवत होती. पहीला निकाल कधी बाहेर पडेल, याची प्रतिक्षा कार्यकर्त्याराड उमेदवारांना लागून होती तोपर्यंत परिरारामधील कोपऱ्या कोपऱ्यावर चर्चा सुरू होती.
पहीला निकाल जाहीर होताच शहरामध्ये फटाके फूटू लागले. निकालानंतर कार्यकर्त्यांच्या दुचाक्या बाहेर पडू लागल्या. या गाडयावर विजयी उमेदवारांच फोटो झळकत होते निकालासाठी आणण्यात आलेल्या, गुलालाच्या बॅगा बाहेर महल्या. गुलालाची उधळण व एकामेकाला गुलाल फासण्याचा उत्साह उशीरापर्यंत सुरू होता. गुलालाबरोबर भगवा रंग ही लावण्यात आला होता.
विजयी उमेदवारांला गुलालाने रंगवून खांद्यावरून मिरवणूक काढण्यात आली. विजयी महीला उमेदवारांना महीला कार्यकर्त्याकडून गुलाल लावला जात होता. दुपारपर्यंत शहरातील विविध भागामध्ये फटाके, गुलाल उधळण सुरू होते. गुलालाचे फवारे ही उधळले जात होते. पराभूत उमेदवारांच्या भागात व कार्यालयामध्ये रान्नाटा जाणवत होता.
तर विजयी उमेदवारांच्या परिरारामध्ये, कार्यालय जवळ गुलालाचे थर दिसत होते. तसेच आमदार सतेज पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा, अमल महाडिक यांच्या शाहुपूरी येथील कार्यालय तसेच धनंजय महाडीक यांच्या कावळा नाका येथील कार्यालयारामोर विजयी उमेदवारांची गर्दी झालेली दिसत होती तसेच हा परिसरही गुलालाने माखला गेला होता.