आबिटकरांच्या मंत्रीपद शपथ विधीचा मतदारसंघात आनंदोत्सव
मोठ्या स्क्रिनवर शपथ सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
कोल्हापूर
नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा समावेश करण्यात आला. त्यांचा समावेश असलेली वार्ता मतदारसंघात पसरताच सर्वत्र जल्लोष सुरू झाला. अनेक अनेक वर्षे उपेक्षित राहिलेल्या या मतदारसंघाला आमदार आबिटकर यांच्या मंत्री रूपाने पद मिळाले आणि अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला हा मतदारसंघ आनंदून गेला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची बाजी करून आनंद व्यक्त केला. सायंकाळी राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये क्रीन लावून कार्यकर्ते व आबिटकर प्रेमी जनतेला शपथविधीचा लाभ घेता आला.
कॅबिनेटमुळे आनंद द्विगुणित
राधानगरी विधानसभा मतदारसंघाला आज अखेर मंत्री पदाला हुलकावणी मिळाली होती दोन वेळा आमदार अबिटकर मंत्री होणार याची आस लागली असताना दोन्ही वेळा पदरी निराशा आली मात्र यावेळी आमदार आबिटकर यांचा मंत्री पदामध्ये समावेश झालाच परंतु थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने विधानसभा मतदारसंघातील जनतेचा आनंद द्विगुणीत