महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठा आरक्षणाच्या आद्यादेशाचा कोगे व महे परिसरात साखर, पेढे वाटून आनंदोत्सव

03:27 PM Jan 28, 2024 IST | Abhijeet Khandekar
Koge and Mahe Maratha Reservation Ordinance Celebration
Advertisement

कसबा बीड / वार्ताहर

कोगे व महे ता. करवीर येथे मराठा समाजाला आरक्षण मिळाले म्हणून साखर, पेढे व घोषणा देत रॅली काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसह समाजाच्या अन्य मागण्या मान्य करण्याचा अध्यादेश मुख्यमंत्री ना . एकनाथ शिंदे यांनी काढल्यानंतर कोगे व महे गावात सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने ग्रामपंचायत चौकात साखर वाटप करून फटाक्याची आतषबाजी केली.

Advertisement

गेली अनेक वर्षे प्रलंबित मराठा आरक्षण संघर्ष व जरांगे पाटील यांच्या पुढाकाराने निघालेला मोर्च याने राज्य शासनास धडकी भरली होती. राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह अन्य मागण्या मान्य करण्याचा अध्यादेश काढल्याची बातमी समजताच कोगे व महे गावातील मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने ग्रामपंचायत चौकत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एक मराठा ... लाख मराठा ,अण्णासाहेब पाटील यांचा विजय असो..... मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो... अशा घोषणाबाजी करत एकत्र आले . यावेळी कार्यकर्त्यांनी गावातुन मोटारसायकल रॅली काढून गावातील चोका चौकात फटाक्यांची आतषबाजी करत साखरवाटप केली.

Advertisement

कोगे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक ग्रामपंचायत सरपंच सौ. बनाबाई यादव,आंबुबाई पाटील, सविता चौगले , मराठा महासंघ जिल्हा संघटक सचिन पाटील, समन्वयक दिपक पाटील, उत्तम पाटील, रणजीत पाटील , शिवाजी पाटील , करण पाटील, शिवाजी मोरे, राहुल पाटील, सुहास पाटील आदी उपस्थित होते.

महे येथे मराठा समाजाला आरक्षण मिळाले याबद्दल आनंद व्यक्त करताना मनोगत सरपंच सर्जेराव जरग, माजी सरपंच सज्जन पाटील, माजी उपसरपंच सचिन पाटील, राष्ट्रीय ग्राहक मंचचे अध्यक्ष जगदीश पाटील, यांनी व्यक्त केले. यावेळी भैरवनाथ विकास सेवा चेअरमन पांडूरंग पाटील, व्हा . चेअरमन सागर कांबळे, यशवंत बॅक माजी संचालक पांडूरंग केरबा पाटील आदी उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या माध्यमातून पुढाकार घेतलेल्या मनोज जरांगे - पाटील यांचे कोगे व महे या गावातील सकल मराठा समाजाच्यावतीने आभार मानण्यात आले .

Advertisement
Tags :
Koge and MaheMaratha reservation ordinance
Next Article