महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कॅलिफोर्नियात उत्सवप्रसंगी गोळीबार

06:52 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / ऑकलंड

Advertisement

अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील ऑकलंड येथे एक पारंपरिक ज्युनेटिंथ नामक उत्सव साजरा करण्यात येत असताना अज्ञातांनी गोळीबार केल्याने अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या उत्सवात भाग घेण्यासाठी 5 हजार नागरिक येथे आलेले होते. गोळीबार झाल्यानंतर त्यांच्यात पळापळ झाली. परिणामी, चेंगराचेंगरीत काही जण जखमी झाले. कोणी मृत झाल्याचे वृत्त मात्र अद्याप नाही.

Advertisement

मेरीट नामक सरोवरानजीक हा उत्सव गुरुवारी रात्री साजरा केला जात होता. अनेक वाहने आणि दुचाक्या कार्यक्रमस्थळानजीक पार्क करण्यात आल्या होत्या. या गाड्यांमुळे लोकांच्या येण्याजाण्याचे काही मार्ग बंद झाले होते. अशा परिस्थितेत काही अज्ञात व्यक्तींनी, उत्सव साजरा करण्यावर गोळीबार करण्यास प्रारंभ केला. अनेक काडतुसे घटनास्थळातून जप्त करण्यात आली आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे.

अद्याप अटक नाही

हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी त्वरित हा भाग पिंजून काढण्यात आला. तथापि, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. गर्दीत उभे असणाऱ्या काही हल्लेखोरांनी पोलिसांवर हल्ले करून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. तथापि, या हल्लेखोरांना वेळीच रोखण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेची चौकशी गुप्तचरांकडून करण्यात येत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. जखमींवर अनेक रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार करण्यात येत आहेत.

हा उत्सव का होतो...

जूनेटिंथ हा उत्सव 1865 पासून साजरा करण्यात येत आहे. 18 जून 1865 या दिवशी अमेरितल्या टेक्सास प्रांतातील अनेक गुलामांना स्वातंत्र्य देण्यात आले होते. तसेच येथील अंतर्गत यादवी युद्धाचीही समाप्ती झाली होती. अब्राहम लिंकन यांच्या काळात या घडामोडी घडल्या होत्या. या घटनांची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी 19 जूनपासून पुढे एक-दोन दिवस हा उत्सव येथील नागरिक साजरा करतात. या उत्सवावर असा हल्ला होण्याचा प्रसंग आजवर एकदाही घडला नव्हता. आता हा सर्व परिसर जाण्यायेण्यासाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article