For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपच्या विजयाचा मडगावात आनंदोत्सव

12:46 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
भाजपच्या विजयाचा मडगावात आनंदोत्सव
Advertisement

मडगाव : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये भाजपने मोठा विजय प्राप्त केला. त्यांचा आनंदोत्सव फटाके वाजवून व जोरदार घोषणा देऊन दक्षिण गोवा भाजप कार्यालयाजवळ साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवात मडगावचे आमदार दिगंबर कामत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर सहभागी झाले होते. यावेळी आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना आमदार दिगंबर कामत म्हणाले की, हा ऐतिहासिक निकाल आहे. भाजपच्या या विजयाने देशाच्या विविध भागात एक संदेश दिला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात छत्तीसगडमध्ये काँग्रेस विजयी होणार असल्याचा दावा केला जात होता. परंतु, काल एकदम विरोधी निकाल लागला असून भाजपने छत्तीसगड जिंकला. काँग्रेसचे उपमुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळातील बऱ्याच मंत्र्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. लोकशाहीत प्रजा ही सुप्रिम असते व तेच या निकालाने दाखवून दिले आहे. प्रजेने पूर्ण विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दाखविला आहे. तलंगणामध्ये भाजपचा केवळ एक आमदार होता. आज त्या ठिकाणी 9 आमदार निवडून आले आहेत. हीच परिस्थिती संपूर्ण देशभरात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेले कार्य व प्रामाणिकपणे लोकांची केलेली सेवा, हेच या निकालातून स्पष्ट झाले आहे. पुन्हा एकदा देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे हे या निकालातून स्पष्ट होत आहे. भाजपवर टीका करणाऱ्यांचे डोळे या निकालातून उघडणार असल्याचे श्री. कामत म्हणाले.

Advertisement

येणाऱ्या लोकसभेची ही नांदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य जनतेसाठी राबविलेल्या योजना तसेच केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तल्लख बुद्धी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. न•ा यांचे संघटन व स्थानिक तसेच इतर कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी दिलेले योगदान यातूनच भाजपने मोठी बाजी मारली. ही आगामी लोकसभेची नांदी असल्याची प्रतिक्रीया भाजपचे प्रदेस सरचिटणीस दामू नाईक यांनी यावेळी व्यक्त केली. मोदीजी सारखा दुसरा नेता या देशात नाही हे पुन्हा एकदा या निकालाने दाखवून दिले आहे असे ही दामू नाईक म्हणाले.

Advertisement

मोदीचे नेतृत्व देशाने स्वीकारले

चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालातून देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले असल्याचे स्पष्ट होत आहे असे आमदार उल्हास तुयेकर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हणाले. आमदार तुयेकर हे तेलंगणामध्ये प्रचारासाठी गेले होते. त्या ठिकाणी भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे. भविष्यात या ठिकाणी भाजप सरकार स्थापन करणार असल्याचे हे संकेत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत येथील मतदार हे भाजपला कौल देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, मडगाव पालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर, नगरसेविका श्वेता लोटलीकर, मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर, दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, सर्वानंद भगत, आशा गांवस, डॉ. स्नेहा भागवत तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.