For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत स्वातंत्र्याच्या 250 वर्षांचा ‘उत्सव’

06:30 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत स्वातंत्र्याच्या 250 वर्षांचा ‘उत्सव’
Advertisement

वॉशिंग्टनमध्ये इतिहासातील सर्वात मोठी आतषबाजी : न्यूयॉर्कमध्ये हवाई प्रदर्शन, मियामीमध्ये संगीत कार्यक्रम

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा 250 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी राजधानी वॉशिंग्टन डीसी इतिहासातील सर्वात मोठ्या आतषबाजीने उजळून निघाली. त्याचबरोबर न्यूयॉर्कमध्ये हवाई प्रदर्शन, मियामीमध्ये संगीत कार्यक्रम आणि फिलाडेल्फियासह देशभरात परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वॉशिंग्टनमध्ये 8,50,000 फटाक्यांसह इतिहासातील सर्वात मोठ्या आतषबाजीचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभादरम्यान राष्ट्राध्यक्षांच्या विशेष विमानाने एअर फोर्स वन हवाई संचलनही केले.

Advertisement

अमेरिकेने शनिवारी देशभरात भव्य सोहळ्यांसह स्वातंत्र्याची 250 वर्षे साजरी केली. सर्व 50 राज्यांमध्ये परेड, हवाई प्रदर्शन, संगीत कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रम वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल मॉलमध्ये पार पडला. याठिकाणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित केले. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी साम्यवादावर जोरदार हल्ला चढवला. पाऊस आणि वादळी पावसामुळे कार्यक्रमाला विलंब झाला, परंतु हवामान निवळल्यानंतर सोहळा पुन्हा सुरू झाला.

Advertisement
Tags :

.