कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करा

03:04 PM Apr 12, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

दक्षिण सोलापूर : 

Advertisement

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुण मंडळांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत साजरी करावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले. गुरुवारी, मंद्रूप पोलीस ठाण्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती व मंडळाला मार्गदर्शन करताना बोलत होते.

Advertisement

मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील शांतता समिती सदस्य, जयंती मंडळे, पोलीस पाटील यांची पोलीस ठाणे येथे बैठक घेण्यात आली. यावेळी जयंती मंडळांना शासनाचे निर्देशांनुसार खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या.

डॉ. आंबेडकर यांच्या जयंती मंडळांनी मिरवणुकीसाठी पोलिसांकडून आवश्यक ती पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
तसेच ध्वनिप्रदूषण मर्यादा नियमांचे पालन करणे बंधनकारक येणार आहे. या मिरवणुकीत किंवा कार्यक्रमांमध्ये कोणताही भडकावू, द्वेषपूर्ण, सामाजिक किंवा धार्मिक भावना दुखावणारा मजकूर, बॅनर, घोषणाबाजी किंवा गाणी वाजवू नयेत आणि मद्यपान करून मिरवणुकीत सहभागी होऊ नयेत.

परंपरागत मिरवणूक मार्गाने मिरवणूक काढावी. मिरवणूक मार्गावरती व कार्यक्रम स्थळी आवश्यकतेवेळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व स्वयंसेवकांची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. या मिरवणुकीमुळे स्थानिक नागरिकांची व आपत्कालीन सेवांची वाहतूक अडथळ्यामुळे बाधित होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित मंडळ अथवा आयोजक यांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपत्कालीन परिस्थिती मध्ये कोणत्याही अफवांचा प्रसार होणार नाही. यासाठी सर्व नागरिकांनी सजग राहावे. शंकाास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती द्यावी. तसेच जयंती उत्सव शांततेत पार पडण्याची संपूर्ण जबाबदारी जयंती मंडळाचे पदाधिकारी यांची असेल, याची खबरदारी घ्यावी, असेही सहायक पोलीस निरीक्षक पवार यांनी म्हणाले. या बैठकीस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध तरुण मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article