For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

२२ जानेवारीला दिवाळी साजरी करा; पंतप्रधान मोंदींचं आवाहन

08:33 PM Dec 30, 2023 IST | Kalyani Amanagi
२२ जानेवारीला दिवाळी साजरी करा  पंतप्रधान मोंदींचं आवाहन
Advertisement

Advertisement

२२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनदिनी देशभरात दिवाळी साजरी करावी. तसेच घरोघरी रामज्योती पेटावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. अयोध्येत आज मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं. यावेळी आयोजित सभेत मोदी बोलत होते.

सर्व देशवासियांना माझी आणखी एक प्रार्थना आहे की, प्रत्येकाची इच्छा आहे की २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी अयोध्येला जावं. पण ते तुम्ही देखील जाणता की सर्वांना इथं येणं शक्य नाही. त्यासाठी देशभरातील रामभक्तांना माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनी २२ जानेवारी रोजी एकदा विधीपूर्वक कार्यक्रम झाल्यानंतर २३ जानेवारीनंतर आपल्या सोयीनुसार अयोध्येला यावं.अयोध्येला २२ जानेवारीला जायचंच असं करु नका. प्रभू रामाला त्रास होईल असं आपण भक्त कधी करणार नाहीत. साडे पाचशे वर्षे आपण वाट पाहिली काही दिवस अजून वाट पाहुयात, असं आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.