For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बकरी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन

10:57 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
बकरी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन
Advertisement

शांतता समिती-वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका

Advertisement

बेळगाव : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी खडेबाजार पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले. या बैठकीत मोहन कारेकर, विजय आचमनी, हाजीअली नुरानी, बाबू किल्लेकर, राहुल जाधव, ए. के. धारवाडकर, शशी होसमनी, वरदराज परमाज, मजहर ताशिलदार, पप्पू पठाण आदीनींही विचार मांडले. पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी शांतता सदस्यांचे स्वागत केले. बसू नवकुडी यांनी आभार मानले. दरम्यान, पोलीस आयुक्त कार्यालयातही गुरुवारी सायंकाळी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक झाली. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथून बदली करण्यात आलेले अधिकारी पुन्हा बेळगावात परतले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.