भूमी पेडणेकर-अर्जून कपूरच्या सेटवर कोसळलं छत
मेरे हसबंड की बिवी च्या सेटवर घडली दुर्घटना
या दुर्घटनेत काहींना किरकोळ दुखापत
मुंबई
मुंबईमध्ये रॉयल पाम्स इंपेरिअल पॅलेसमध्ये सध्या मेरे हसबंड की बीवी या सिनेमाचे शुटींग सुरू आहे. या शुटींगच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे. सेटवर अचानक छत कोसळले, त्यामुळे सर्व कलाकार व तंत्रज्ञ यांच्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. तर काहींना किरकोळ दुखापत झालेली आहे. ही घटना घडली तेव्हा सेटवर अभिनेता अर्जून कपूर, भूमी पेडणेकर, जॅकी भगनानी आणि दिग्दर्शक मुदस्सर अजीज हे उपस्थित होते.
मेरे हसबंड की बीवी या सिनेमातील गाण्याचे शुटींग सुरू आहे. पहिल्या दिवशी शुटींग व्यवस्थित झाले. दुसऱ्या दिवशी अचानक शुटींग दरम्यान सेटवर कोसळले आणि मोठा आवाज झाला. ही घटना संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेमध्ये अर्जून कपूर, भूमी पेडणेकर, जॅकी भगनानी आणि दिग्दर्शक मुदस्सर हे किरकोळ जखमी झाले आहेत. याशिवाय सेटवरील काही तंत्रज्ञ आणि क्रू मेंबर्सना किरकोळ दुखापत झाली आहे. याठीकाणी अनेक दिवस मोठ्या आवाजात शुटींग सुरु असल्याने ही दुर्घटना घडल्याचीही चर्चा होत आहे. हा सिनेमा २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.