For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्धबंदीच्या घोषणेने तेजीची दाणादाण

06:25 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्धबंदीच्या घोषणेने तेजीची दाणादाण
Advertisement

सेन्सेक्सची 2946 अंकांची झेप : निफ्टीही 874 अंकांनी दमदार तेजीत : 6 तासात 16 लाखांची कमाई

Advertisement

भारतीय शेअरबाजारासाठी बुधवार हा सर्वात मोठ्या तेजीचा राहिला आहे. सकाळी शेअरबाजार खुला होताच सर्वत्र हिरवाईचा रंग बहरला होता. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दोन आठवड्यांसाठी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर याचे जोरदार स्वागत भारतासह विविध बाजारांनी बुधवारी केल्याचे दिसून आले. सेन्सेक्स तब्बल 2946 अंकांनी तर निफ्टीसुद्धा नव्या जोशात 874 अंकांची तेजी अनुभवत बंद होताना दिसला.

त. भा. वृत्तसंस्था

Advertisement

मुंबई : बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 2946 अंकांनी वाढत 77562 अंकांवर बंद होताना दिसला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजारही कमालीची तेजी राखत बंद झाला. निफ्टी निर्देशांक सरतेशेवटी 873 अंकांच्या दमदार तेजीसोबत 23997 अंकांवर बंद झाला. तर बँक निफ्टी निर्देशांकही कमालीचा फॉर्मात होता. 2987 अंकांच्या तुफान तेजीसमवेत हा निर्देशांक 55703 अंकांवर बंद झाला होता. 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी बँक निर्देशांकाने अनुभवली आहे. बाँड यील्डमध्ये घसरणीने बँका आणि वित्तसंस्थांचे समभाग दौडताना दिसले. बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स व चोला यांचे समभाग 7 ते 10 टक्के इतके तेजीत होते. युद्धबंदी घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक घट झाली. याचा लाभ तेलाशी संबंधीत कंपन्यांना झाला होता. तेल मार्केटिंग कंपन्या व हवाई कंपन्यांचे समभाग 10 टक्केपर्यंत वाढले होते. तर दुसरीकडे ऑटो निर्देशांकानेही 7 टक्के इतका वाढताना दिसला. दिवसाच्या शेवटी बीएसईवरील सुचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य 16 लाख कोटींनी वाढलेले दिसून आले. रुपया मजबूत होत 92.58 वर बंद झाला होता.

क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी

विविध क्षेत्राच्या निर्देशांकांच्या कामगिरीत सीपीएसईचा निर्देशांक घसरणीत होता. यानंतर ऑटो, कमोडिटीज, एनर्जी, फायनॅन्शीयल, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. ऑटो निर्देशांक 1629 अंकांनी वाढत 26002 अंकांवर बंद झाला तर फायनॅन्शीयल्सचा निर्देशांकही 1367 अंकांनी वाढत 26053 अंकांवर बंद झाला.

Advertisement
Tags :

.