महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सदाशिवनगरातील सीडी वर्कचे काम रखडले

11:49 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे जून महिन्यात मुसळधार पावसामुळे नाल्याचे सीडी वर्क कोसळले होते. दोन महिन्यांनी या ठिकाणी खडी व इतर साहित्य टाकण्यात आले खरे. परंतु, अद्याप कामाला सुरुवात न केल्याने सीडी वर्कसाठी आलेली खडी वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने एक तर काम सुरू करा अन्यथा खडी इतरत्र हलवा, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. सीडी वर्क कोसळल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी ही बाब आमदार राजू सेठ यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार तसेच मनपा आयुक्तांनी या परिसराला भेट देत सीडी वर्कच्या कामाला मंजुरी दिली. साहित्यही आणून टाकण्यात आले. परंतु, दोन महिने उलटले तरी काम सुरू करण्यात आलेले नाही. मुख्य रस्त्यावरच खडी टाकण्यात आल्यामुळे पुढील परिसरात ये-जा करणाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article