कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्व मेडिकलमध्ये 'सीसीटीव्ही'

05:13 PM Feb 26, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

आटपाडी / सूरज मुल्ला  : 

Advertisement

विटा येथे सापडलेली ड्रग्जची फॅक्टरी, गांजाचे साठे, मिरजेत पकडलेल्या ५०० नशेच्या गोळ्यांचा साठा आदी एका पाठोपाठ एक घडलेल्या घटनांनी जिल्ह्यातील नशेखोरी चव्हाट्यावर आली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या तरूणाईला नशेची साधने सहज उपलब्ध होत असून त्यामुळे प्रशासनाचेही धाबे दणाणले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंमलीपदार्थ विरोधात टास्क फोर्स तयार करत कडक मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

मेडिकलमधील औषधांचा वापर नशेसाठी होत असल्याच्या घटनाही प्रकर्षाने यापूर्वीही राज्यात आणि जिल्ह्यात उजेडात आल्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्व मेडिकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे निर्देश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी २०२३ मध्ये दिले होते. त्याची त्यावेळी अंमलबजावणी झाली नाही. आत्ता मात्र नशेच्या गोळ्यांचा विषय ऐरणीवर आल्यामुळे तात्काळ जिल्हयातील सर्व औषध विक्री दुकानात सीसीटीव्ही सक्तीची करण्यात आली आहे.

लहान मुलांना मेडिकलमधून शेड्युल एच, एच-१ व एक्स औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय सहज मिळतात. त्यामुळे या औषधांची विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषघ विक्री करणाऱ्या सर्व मेडिकलवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य केले आहे.

मंगळवारी झालेल्या एनकॉर्ड' समितीच्या  बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मेडिकलमध्ये सीसीटीव्ही बसविले गेले नसल्याने नाराजी व्यक्त करत कार्यवाहीचे निर्देश दिले. अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त जे. पी. सवदत्ती यांनी मेडिकलमधील औषधांचा नशेसाठी होणारा वापर टाळण्यासाठी व संभाव्य धोके दूर करण्यासाठी सर्व मेडिकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याच्या सूचना केल्या आहेत.

१५ दिवसात याबाबत कार्यवाही करायची असून त्याबाबत सहा. आयुक्त जे. पी. सवदत्ती यांनी विविध तालुक्यातील औषध विक्रेत्यांच्या बैठका घेवुन मार्गदर्शन व प्रबोधन केले. नशेखोरीचा विळखा वाढत असताना त्याविरोधातील लढाईत सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा ठरत आहे. बहुतांश मेडिकलमध्ये सुरक्षेसाठी यापुर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. परंतु जेथे नाहीत, त्यांनी तात्काळ सीसीटीव्ही बसवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशा सूचना करण्यात आल्या. 

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्या जाणाऱ्या शेड्युल एच, एच-१ व एक्स औषधांचा वापर लहान मुले नशेसाठी करत आहेत. ही बाब गंभीर ठरली असून नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्याला पकडण्यात आल्याने त्या कोणत्या मेडिकलमधून खरेदी केल्या, त्याचीही चौकशी पोलीस प्रशासन करत आहे. या सर्वांचा मेडिकल चालकांना त्रास होऊ नये, यासाठी सीसीटीव्ही गरजेचे ठरले आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article