For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्धाच्या सावटात सीबीएसई अलर्ट

06:16 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्धाच्या सावटात सीबीएसई अलर्ट
Advertisement

बहारीन ते युएईपर्यंत 10-12 च्या परीक्षा लांबणीवर

Advertisement

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मध्यपूर्वेच्या अनेक देशांमध्ये सोमवारी होणारी इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा टाळल्या आहेत. क्षेत्रात बिघडती सुरक्षा स्थिती पाहता सीबीएसईने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अधिकृत अधिसूचनेत 2 मार्चच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या असुन नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

5 मार्चपासून सुरु होणाऱ्या उर्वरित परीक्षांवर मंगळवारी स्थितीचे आकलन करत त्या आधारावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सीबीएसईने सांगितले आहे. हा निर्णय बहारीन, ईराण,  कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरामधील सीबीएसईशी संबंधित शाळांवर लागू होणार आहे. या देशांमध्ये मोठ्या संख्येत भारतीय परिवार राहतात आणि त्यांची मुले सीबीएसई शाळांमध्ये शिकतात.

Advertisement

परीक्षा स्थगित झाल्याने या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे, याचबरोबर अनिश्चितताही वाढली आहे. पालक सातत्याने सीबीएसईची वेबसाइड पडताळून पाहत आहेत. सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरू झाल्या होत्या. इयत्ता 10 वीच्या परीक्षा 11 मार्चपर्यंत तर इयत्ता 12 वीच्या परीक्षा 10 एप्रिलपर्यंत चालणार होत्या.

मध्यपूर्वेतील तणाव वाढल्यावर अनेक शाळांनी सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली होती. केवळ 2 मार्च रोजीची परीक्षा टाळण्यात आली असून उर्वरित परीक्षांबद्दल विचार करण्यात येत असल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. सुरक्षा सर्वात महत्त्वपूर्ण असल्याचे विद्यार्थी आणि शिक्षकांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.