महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महुआ मोइत्रा विरोधी चौकशीला सीबीआयकडून वेग

06:03 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वकील देहाद्राई यांना केले पाचारण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सीबीआयने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर चौकशीला वेग दिला आहे. सीबीआयने मोइत्रा यांच्या विरोधात तक्रार नोंदविणारे वकील जय अनंत देहाद्राई यांना चौकशीसाठी समन्स पाठविला आहे. त्यांना 25 जानेवारी रोजी प्राथमिक चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोइत्रा यांच्या विरोधात लोकपालकडे तक्रार नोंदविली होती. मोइत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे  स्वीकारल्याचा आरोप आहे. मोइत्रा यांच्यावर आर्थिक लाभासाठी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचाही आरोप आहे. तृणमूल नेत्याच्या विरोधात लोकपालकडून तक्रार नोंदविण्यात आल्यावर सीबीआयने प्राथमिक तपास सुरू केला होता. मोइत्रा यांच्या विरोधात लोकसभेतील शिष्टाचार समितीने चौकशी केली होती. समितीच्या शिफारसीनुसार मोइत्रा यांना संसद सदस्यत्व गमवावे लागले हेते.

 

 

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article