For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचा छापा

07:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचा छापा
Advertisement

30 ठिकाणी कारवाई : किरू जलविद्युत प्रकल्पात 300 कोटींची लाचप्रकरण

Advertisement

वृत्तसंस्था /लखनौ

जम्मू-काश्मीर आणि गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरासह 30 हून अधिक ठिकाणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) गुऊवारी छापे टाकले. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटाशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने ही छापेमारी केल्याची माहिती  देण्यात आली. सीबीआयने टाकलेल्या छापेमारीमधील 30 ठिकाणांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा या राज्यांतील मालमत्तांचा समावेश आहे. सत्यपाल मलिक यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्प प्रकरणात सीबीआयने सत्यपाल मलिक यांच्या मालमत्तांवर छापा टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वषी मे महिन्यातही सीबीआयने याच प्रकरणात 12 ठिकाणी छापे टाकले होते. आता नव्याने केलेल्या कारवाईवेळी किरू जलविद्युत प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत. जलविद्युत प्रकल्प कंत्राट प्रकरणात छापा टाकण्यासाठी सीबीआयचे पथक गुरुवारी सकाळी उत्तर प्रदेशातील बागपत येथील सत्यपाल मलिक यांच्या घरी पोहोचले होते. त्यांच्याविरोधात तपास यंत्रणेने शोधमोहीम सुरू केली आहे. सत्यपाल मलिक हे मूळचा बागपतच्या सिंघावली अहिर पोलीस स्टेशन हद्दीतील हिसावडा गावचे रहिवासी आहेत. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमध्ये 300 कोटी ऊपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सीबीआयने एप्रिल 2022 मध्ये पाच आरोपींविऊद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली होती. या प्रकल्पात 2,200 कोटींची कंत्राटे देताना अनियमितता झाल्याचा आरोप आहे. किरू जलविद्युत प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआय शोधमोहीम राबवत आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या कार्यकाळात किश्तवाडमधील जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स निकाली काढण्यासाठी 300 कोटी ऊपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता.

Advertisement

विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न : सत्यपाल मलिक

सीबीआयच्या धाडीवर सत्यपाल मलिक यांची प्रतिक्रियाही समोर आली असून त्यांनी आपल्याला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. ‘गेल्या 3-4 दिवसांपासून मी आजारी असून ऊग्णालयात दाखल आहे. असे असतानाही सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर छापे टाकले जात आहेत. माझा चालक आणि सहाय्यक यांच्यावरही छापे टाकून नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.