For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

16.51 लाखांचा दंड न भरल्यास सालेमला 18 वर्षांची अतिरिक्त शिक्षा सीबीआयची विशेष न्यायालयात माहिती

10:24 PM Jul 25, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
16 51 लाखांचा दंड न भरल्यास सालेमला 18 वर्षांची अतिरिक्त शिक्षा सीबीआयची विशेष न्यायालयात माहिती
Advertisement

मुंबई, दि. 24 (प्रतिनिधी) मुंबईवरील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी गँगस्टर अबू सालेमने जर 16.51 लाखांचा प्रलंबित दंड भरला नाही, तर त्याला आणखी 18 वर्षे 6 महिने तुऊंगात राहावे लागेल, अशी माहिती पेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी विशेष न्यायालयात दिली. अबू सालेम आणि कारागफह प्रशासनाने दंडाच्या रकमेबाबत न्यायालयात स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर सीबीआयने आपले उत्तर सादर केले.

Advertisement

अबू सालेमला दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये विशेष टाडा न्यायालयाने जन्मठेपेसह आर्थिक दंडही ठोठावला होता,मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात 8 लाख ऊपयांचा दंड (दंड न भरल्यास 8 वर्षांची अतिरिक्त शिक्षा) तसेच बिल्डर प्रदीप जैन हत्या प्रकरणात 8.51 लाख ऊपयांचा दंड. (दंड न भरल्यास 10 वर्षे 6 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा) ठोठावण्यात आला होता.

या प्रलंबित दंडाच्या रक्कमेकडे सीबीआयने शुक्रवारी न्यायालयाचे लक्ष वेधले आणि अबू सालेमने दंड न भरल्यास त्याला आणखी 18 वर्षे 6 महिने तुऊंगात राहावे लागणार असल्याची स्पष्ट माहिती दिली. अबू सालेमला 2005 मध्ये पोर्तुगालमधून भारतात प्रत्यार्पण करून आणण्यात आले होते.

Advertisement

त्यावेळी भारत सरकारने सालेमला 25 वर्षांपेक्षा जास्त काळ तुऊंगात ठेवले जाणार नाही, असे आश्वासन पोर्तुगाल सरकारला दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सालेमची 25 वर्षांची मुदत 12 ऑक्टोबर 2030 रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीआयचे विशेष सरकारी वकील डी. एन. साळवी यांनी शुक्रवारी न्यायालयात भूमिका मांडली.

Advertisement
Tags :

.