For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीबी 350 रेट्रो क्लासिक बाजारात लाँच

06:00 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
सीबी 350 रेट्रो क्लासिक बाजारात लाँच
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

होंडा या कंपनीने सीबी 350 रेट्रो क्लासिक ही दुचाकी नुकतीच लाँच केली आहे. सदरच्या दुचाकीची किंमत 1 लाख 99 हजार रुपये इतकी असणार आहे. डीएलएक्स व डीएलएक्स प्रो या दोन प्रकारात ही मोटरसायकल लाँच करण्यात आली असून होंडाच्या बिगविंग या विक्रेत्या शोरुममधून ग्राहकांना नवी गाडी बुक करता येणार आहे.

रॉयल इनफिल्ड क्लासिक व बेनेली इंपेरियल 400 प्रमाणे या नव्या गाडीचे डिझाइन आहे. टाकी नव्याने रचलेली असून नवी सीटही या गाडीला आहे, यामुळे गाडीस रेट्रो लुक प्राप्त झालेला आहे. टेलिस्कोपिक फोर्क, ड्युअल रिअर शॉक्स, ड्युअल चॅनेल एबीएस, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलइडी लाइटिंग अशा सुविधाही यात आहेत. ही मोटरसायकल प्रिसीयस रेड मेटालिक, पर्ल इग्नीयस ब्लॅक, मॅटी क्रस्ट मेटालिक, मॅटी मार्शल ग्रीन मेटालिक व मॅटी ड्युन ब्राऊन या पाच रंगात सादर करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.