For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओटवणेत गुरांचा गोठा आगीत भस्मसात

12:00 PM Jan 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
ओटवणेत गुरांचा गोठा आगीत भस्मसात
Advertisement

गाभण म्हशींसह मालक गंभीर जखमी

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत तीन गाभण म्हशींसह मालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उशिरा ओटवणे देऊळवाडीत घडली.आगीमध्ये होरपळणाऱ्या म्हशींची दावे मालकाने कापल्यामुळे या तीन गाभण म्हशींचा जीव वाचला.
ओटवणे देऊळवाडीतील जयसिंग विष्णू गावकर यांनी घराच्या बाजूलाच असलेल्या गोठ्यातील मच्छरना परावृत्त करण्यासाठी धुराची धुकटी घालून शेतात गेले. मात्र काही वेळाने गोठ्याला आग लागल्याचे जयसिंग गावकर यांना समजताच त्यानी गोठ्यात होरपळणाऱ्या म्हशींची दावे तोडून त्यांची सुटका केली. मात्र एक म्हैस गंभीर जखमी तर इतर दोन म्हशींचे किरकोळ दुखापत झाली. जयसिंग गावकर यांच्या हातासह डोक्याला गंभीर दुखापत झाली.दरम्यान शेजाऱ्यांनी मोटार पंपाच्या सहाय्याने पाईपने ही आग विझवली. मात्र तोपर्यंत हा गोठा आगीत भस्मसात झाला. गुरांचे डॉक्टर अनिकेत कुडाळकर यांनी जखमी म्हशीवर उपचार केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.