महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जातीनिहाय जनगणनेला तेलंगणात प्रारंभ

06:55 AM Nov 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

80 हजार कर्मचाऱ्यांकडून गावोगावी माहिती संकलन

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

तेलंगणामध्ये बुधवारपासून जातीय जनगणना सुरू झाली आहे. जातीच्या आधारावर लोकांची आर्थिक आणि सामाजिक माहिती गोळा करणे हा त्याचा उद्देश असून त्याआधारे समाजातील सर्व घटकांतील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांची ओळख पटवली जाणार आहे. तेलंगणा सरकारने नियुक्त केलेले सर्वेक्षण अधिकारी-कर्मचारी लोकांच्या दारापर्यंत पोहोचणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान जातीनिहाय सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले होते.

राज्यातील जातीनिहाय सर्वेक्षण महिनाभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. सरकारी अधिकाऱ्यांशिवाय काँग्रेस नेतेही या सर्वेक्षणात सक्रिय सहभागी होऊन लोकांना प्रवृत्त करतील आणि अधिकाऱ्यांना मदत करतील. प्रत्येक सर्वेक्षणकर्ता सुमारे 150 घरांना भेट देत लोकांना 50 पेक्षा जास्त प्रश्न विचारेल. या अहवालाच्या आधारे समाजातील दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी आणि विकास योजना प्रभावीपणे राबवता येतील, असा विश्वास राज्य सरकारला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातीय जनगणना उपक्रमाचे कौतुक केले आहे. हे केवळ जातीय सर्वेक्षण नसून विकासाची चौकट तयार करण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारच्या जात सर्वेक्षणात काही त्रुटी असतील, पण त्या दूर केल्या जातील, अशी कबुली त्यांनी दिली. देशातील भेदभावाची परिस्थिती गंभीर आहे आणि त्याचा आपल्या राज्यघटनेवरही परिणाम होतो, हे आपण समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

अचूक माहिती देण्याचे आवाहन

राज्यातील नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता सर्वेक्षणकर्त्यांना अचूक माहिती द्यावी असे आवाहन राज्य परिवहन मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका कार्यालयात सर्वेक्षण सुरू करताना केले. या सर्वेक्षणामध्ये घेण्यात आलेली माहिती गोपनीय राहील. या सर्वेक्षणाचा उद्देश असमानता दूर करणे आणि सर्वांना समान न्याय सुनिश्चित करणे हा असल्याचेही ते म्हणाले. जातीय सर्वेक्षणामुळे समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी योजना तयार करण्यात सरकारला मदत होईल, असे राज्याचे आयटी मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article