For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सेवा संकल्प अभियान’तून विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीला गती

06:10 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘सेवा संकल्प अभियान’तून विद्यार्थ्यांसाठी  जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीला गती
Advertisement

मुंबई, 

Advertisement

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र विहित वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थी तसेच इयत्ता 12 वीमध्ये शिक्षण घेत असलेले आणि व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे मागासवर्गीय विद्यार्थी यांना या मोहिमेचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, एसईबीसी आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीस्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी त्रुटीपूर्तता शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. प्रकरणांमधील त्रुटींची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.