For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जातीय सर्वेक्षण अहवाल ‘चुकीचा ’ : राहुल गांधी

06:11 AM Jan 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
जातीय सर्वेक्षण अहवाल ‘चुकीचा ’   राहुल गांधी
Advertisement

बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांना बसणार फटका :

Advertisement

► वृत्तसंस्था / पाटणा

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 2023 मध्ये बिहारमध्ये करविण्यात आलेल्या जातनिहाय सर्वेक्षणाला बनावट ठरविले आहे. अशा स्थितीत राहुल यांचे हे वक्तव्य राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी अडचणीचे सबब ठरू शकते असे मानले जात आहे. बिहारमध्ये 2 ऑक्टोबर 2023 रोजी जातनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल मांडण्यात आला तेव्हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार सत्तेवर होते आणि राजद तसेच काँग्रेसही या सरकारमध्ये सामील होते. तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये जातनिहाय सर्वेक्षण करविण्याचे श्रेय घेतले होते. माझ्या दबावामुळेच नितीश कुमार यांनी जातनिहाय सर्वेक्षण करविल्याचा दावा तेजस्वी यांनी केला होता.

Advertisement

9 नोव्हेंबर 2023 रोजी विधानसभेत बिहार आरक्षण (दुरुस्ती) अधिनियम 2023 संमत करण्यात आला, त्यावेळीही तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये आरक्षणाची कक्षा वाढण्याचे श्रेय घेतले होते. नव्या कायद्याच्या आधारावर आरक्षणाची कक्षा 50 टक्क्यांवरून 65 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली होती.

प्रकरण न्यायप्रविष्ठ

मागील वर्षी पाटणा उच्च न्यायालयाने आरक्षणाची कक्षा 65 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घटनाबाह्या ठरवत त्याला स्थगिती दिली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर तेजस्वी यादव यांच्या राजदनेही याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या हे पूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहे.

तेजस्वी यांच्या अडचणी वाढल्या

बिहारमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणा आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत तेजस्वी यांनी जातनिहाय सर्वेक्षण करण्याचा मुद्दा उपस्थित करत बिहारमध्ये जातआधारित आरक्षण वाढविण्याचे श्रेय घेत भाजपला आरक्षणविरोधी ठरविले होते. याचदरम्यान राहुल गांधी यांनी पाटणा येथे संविधान सुरक्षा संमेलनाला संबोधित करताना जातनिहाय सर्वेक्षणच बनावट पद्धतीने झाल्याचे म्हटलने तेजस्वी यादव अडचणीत आले आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे तेजस्व यांचा दावाच संशयात सापडला आहे. 2023 मध्ये तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री असतानाच हे जातनिहाय सर्वेक्षण करण्यात आले होते. याचमुळे त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

राहुल गांधींचा सेल्फ गोल

जातनिहाय सर्वेक्षणाला बनावट ठरवत राहुल गांधी यांनी एकप्रकारे सेल्फ गोल केल्याचे मानले जात आहे. महाआघाडी सरकारने बिहारमध्ये जातनिहाय सवेंक्षण करविले होते आणि तेव्हा काँग्रेस त्या सरकारमध्sय सामील होता. तसेच काँग्रेसने देखील बिहारमध्ये जातनिहाय सर्वेक्षण करण्याचे श्रेय घेतले होते. आणि आता या अहवालाला राहुल गांधी यांनी बनावट ठरविले आहे. राहुल गांधी यांचा हा दावा आगामी काळात तेजस्वी यादव यांच्यासाठी अडचणी उभा करणार आहे. बिहारमध्ये राजकारण हे जातोवर आधारित असून तेजस्वी यादव यांना आता पुढील काळात जातनिहाय सर्वेक्षणाचे श्रेय घेता येणार नाही. तसेच त्यांचा पक्ष स्वत:ला दलित अन् मागासांचा पाठिराखा म्हणवून घेऊ शकणार नसल्याचे तज्ञांचे मानणे आहे.

Advertisement
Tags :

.