For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काजू बी अनुदान योजनेस 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ! पणनचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांची माहिती

04:25 PM Sep 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
काजू बी अनुदान योजनेस 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ   पणनचे उपसरव्यवस्थापक डॉ  सुभाष घुले यांची माहिती
Cashew seed grant scheme
Advertisement

महाराष्ट्र राज्य काजु मंडळाच्या माध्यमातुन काजु उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजु बी अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेस 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती पणनचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.

Advertisement

योजनेचा लाभ घेण्यासाठी काजु उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारावर काजु लागवडीची झाडांची नोंद असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षम काजुंच्या झाडांची संख्या व त्यापासुन प्राप्त काजु बी उत्पादन याबाबतचा दाखला देणे आवश्यक आहे. काजु उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजु व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ, व नोंदणीकृत काजु प्रक्रीयादार यांना काजु बी ची विक्री केलेली असणे आवश्यक आहे. काजु उत्पादक शेतकऱ्यांने विक्री केलेल्या काजुची विक्री पावतीवर सदर नोंदणीकृत खरेदीदाराचा जीएसटी क्रमांक, शेतकऱ्याचे संपुर्ण नाव व पत्ता असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काजु उत्पादक शेतकऱ्यांनी आधार सल्लगणीत बचत बॅंक खात्याचा क्रमांकसह तपशील द्यावा. काजु बी अनुदानासाठी विहीत नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य काजु मंडळाकडे 31 ऑगस्टपर्यंत सादर करावयाचे होते. तथापि सदरची योजना सर्वसामान्य काजु उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याने व जास्तीत जास्त काजु उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी योजनेस 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. काजु बी अनुदान योजनेचा परिपुर्ण प्रस्ताव महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, शाहु मार्केट यार्ड कोल्हापूर येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement

.