For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओवळीयेत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत काजू बागायतीचे नुकसान

05:50 PM Feb 27, 2025 IST | अनुजा कुडतरकर
ओवळीयेत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत काजू बागायतीचे नुकसान
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

ओवळीये येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत महादेव गुणाजी कलमिसकर यांच्या मालकीच्या बागेतील काजू, नारळ ,आंबा कलमे मिळून जवळपास २५० झाडे जळून खाक झाली .याबाबत काजू- बागायत मालक महादेव कलमिसकर यांनी कृषी विभाग तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर बागायतीच्या नुकसानीचा स्पॉट पंचनामा केला असून लवकरात लवकर नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी श्री कलमिसकर यांनी केली आहे . ऐन काजू हंगामातच झाडांना आग लागल्याने कलमिसकर यांचे मोठे नुकसान झाले आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.