महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काजू-आंब्याला खराब हवामानाचा फटका

11:57 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कृषी खात्याने काढलेला निष्कर्ष

Advertisement

पणजी : खराब आणि दमट हवामानाचा काजू व आंबा या दोन्ही पिकांना फटका बसल्याचा निष्कर्ष कृषी खात्याने काढला आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे दोन्ही पिकांचा मोहर झडल्याची माहिती कृषी खाते संचालक नेविल आफोन्सो यांनी दिली आहे. हवामानाच्या फटक्यामुळे दोन्ही पिके जवळपास 50 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. ते म्हणाले की, पावसाळा संपल्यानंतर काही महिने तापमान जास्त हवे होते. परंतु तसे झाले नाही. थंडी उशिरा सुरू झाली आणि टिकली नाही. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पाऊस पडला, नंतर उष्णता वाढल्यामुळे पहिला मोहर करपून गेला आणि दुसरा मोहोर आला नाही. काही झाडांना दुसरा मोहोर आला होता तथापि दव, दमट हवामानामुळे दुसरा मोहोरदेखील झडून गेल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

काजू पिकात होणार घट :  शेतकरी संकटात

काजूचे पीक कमी होणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून यंदा काजू पिकातून फारसे काही मिळणार नाही, अशी त्यांची भावना झाली आहे. सत्तरी, सांगे, डिचोली, पेडणे, काणकोण या तालुक्यांत काजूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. तेथील शेतकरी पूर्णपणे काजू पिकांवर अवलंबून आहेत. यंदा पीक कमी व दरही चांगला नसल्याने शेतकऱ्यांचा वार्षिक जमा-खर्च विस्कळीत होणार असल्याचे दिसत आहे. गोव्यातील अनेक भागात गेले काही दिवस दमट हवामान असून अनेक गावांमध्ये तर रात्रीचा दव पडतो. त्याचाही परिणाम काजू पिकांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article