गुळदुवेत काजूपीक शेती शाळा संपन्न
कृषी विभाग व आत्मा यांच्यातर्फे आयोजन
न्हावेली / वार्ताहर
गुळदुवे येथे कृषी विभाग व आत्मा यांच्या अंतर्गत काजुपीक शेती शाळा घेण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक श्री सर्रगुरु यांनी काजू पीक लागवड,खत व्यवस्थापन, गांडुळ खत तयार करणे तसेच सेंद्रिय शेती विषयक योग्य असे मार्गदर्शन केले.शेती शाळेत यावेळी काजू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी आत्माच्या श्रीम्.मीनल परब यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व गट स्थापन करणे बाबत माहिती देत शेती शाळेत घेण्यात येणाऱ्या विविध मार्गदर्शक विषयांची चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाला गुळदुवे सरपंच श्री.शैलेंद्र जोशी,उपसरपंच श्री अशोक धर्णे,ग्रा. पं. सदस्या रुपाली धर्णे,बचत गट सी आर पी,प्रगतशील शेतकरी रुपेश धर्णे,तसेच गावातील महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक कृषि सहाय्यक श्रीम्. प्रिया पवार यांनी केले. कृषी पर्यवेक्षक श्रीम् देसाई यांनी शेतकऱ्यांना फवारण प्रात्यक्षिक ,कीड,रोग नियंत्रण याविषयी माहीत देत येथील उपस्थितांचे आभार मानले.