महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कणकुंबी तपासनाक्यावर पाच लाखांची रोकड जप्त

11:07 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : गोव्याहून हैदराबादकडे जात असलेल्या बसमधून कणकुंबी तपासनाक्यावर पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता विना कागदपत्रे पाच लाख रुपये रोख रकमेची वाहतूक करण्यात येत होती. संबंधित रक्कमेसंदर्भात कागदपत्रे नसल्याने ही रक्कम जप्त करून खानापूर तहसीलदार कोषागरात जमा करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, गोव्याहून हैदराबादकडे जात असलेली बस क्र. जीए 07 एच 8975 यामध्ये प्रवासी साई भास्कर रे•ाr यांच्याजवळ पाच लाख रुपयांची रोकड होती. मात्र या रकमेसंबंधी कोणतीही कागदपत्रे नसल्याने अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता साई भास्कर रे•ाr याने समाधानकारक उत्तरे दिली नसून कागदपत्रेही दाखवली नसल्याने ही रक्कम निवडणूक अधिकारी मलगौंडा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जप्त केली आहे. तसेच खानापूरचे निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांच्याकडे देण्यात आली असून ही रक्कम खानापूर निवडणूक कोषागारात जमा करण्यात आली आहे. याबाबत अधीक तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article