For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

स्टार प्रचारकांनाही रोख रकमेची मर्यादा

06:27 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्टार प्रचारकांनाही रोख रकमेची मर्यादा

एक लाख रु पयांपेक्षा जास्त रक्कम सोबत ठेवण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरात राजकीय रणधुमाळी तीव्र झाली आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादीही प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, स्टार प्रचारकांकडे एक लाख ऊपयांपेक्षा जास्त रोख रक्कम नसावी, असा निर्णयही निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Advertisement

भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा आहेत. त्याचप्रमाणे टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव अशा विविध पक्षांच्या स्टार प्रचारकांचा निवडणूक प्रचार सुरू झाला आहे. या बड्या नेत्यांसह पक्षातर्फे ‘स्टार प्रचारक’ म्हणून जाहीर करण्यात आलेल्या नेत्यांकडे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आढळल्या आयोगाकडून कारवाई होऊ शकते.

Advertisement

निवडणूक आयोगाचे निर्देश

या लोकसभा निवडणुकीत कोणताही स्टार प्रचारक आपल्या खिशात जास्तीत जास्त एक लाख रुपये ठेवू शकतो, असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही पक्षाचा उमेदवार आपल्या खिशात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त ठेवू शकत नाही. त्याचबरोबर प्रचारासाठी आलेला स्टार प्रचारक एक लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम खिशात ठेवू शकत नाही. विहित रकमेपेक्षा जास्त रक्कम आढळल्यास निश्चितच रक्कम जप्त केली जाईल. तसेच त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.

उमेदवारांनी आपल्या दैनंदिन खर्चासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवावे आणि त्याचा संपूर्ण तपशील दररोज निवडणूक आयोगाला पाठवावा, अशा सूचनाही निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. या रजिस्टरमध्ये उमेदवारांनी केव्हा, कुठे आणि किती रॅली काढल्या आणि त्यावर किती खर्च झाला याचा संपूर्ण हिशोब ठेवलाच नाही तर संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जाईल. दैनंदिन फुलांचे हार, खाद्यपदार्थ, ढोल-ताशे, डान्स पार्टी, वाहने आदींचे दरही निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसार भरावे लागतील, असे सूचित करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यातील नामांकन पूर्ण

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 27 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. आता पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची निश्चिती होण्याबरोबरच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 28 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरु वात झाली आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये निवडणुकीचा प्रचारही जोरात सुरू आहे.

Advertisement
Tags :
×

.