सराफ व्यावसायिकाची कार फोडून रोकड, लॅपटॉप लंपास
कोल्हापूर :
शहरातील शाहुपूरी येथील साईक्स एक्सटेंशन समोरील रस्त्यावर उभी केलेल्या सराफ व्यावसायिकांची चारचाकी गाडीची मागील बाजूची काच चोरट्याने फोडून, त्यामधील 1 लाख 53 हजाराची रोकड आणि 20 हजाराचा लॅपटॉप असा 1 लाख 73 हजार ऊपयांचा ऐवज असलेली सॅक चोरून पोबारा केला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली असून, चारचाकीची काच फोडून त्यामधील रोकड, लॅपटॉप चोऊन नेणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यावऊन पोलिसांनी त्या चोरट्याचा शोध सुऊ केला आहे. याची शाहूपुरी पोलिसात नोंद झाली आहे. यांची फिर्याद सराफ व्यावसायिक स्वप्निल मोरे यांनी दिली आहे.
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील सराफ व्यावसायिक स्वप्निल मोरे आणि त्यांचे मित्र महेश विभुते, अभिषेक लिपारे व प्रमोद पवार या तिघांना बरोबर घेवून चारचाकी गाडीतून शुक्रवारी कोल्हापूरात आले. त्यांनी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शाहुपूरी येथील साईक्स एक्सटेंशन समोरील नारायण हावळ यांच्या घराच्या दारात रस्त्यावर उभी केली. ते सर्वजण समोरील चप्पलच्या दुकानात शुज खरेदीसाठी गेले. याचदरम्यानच्या चोरट्यांने त्यांच्या चारचाकी गाडीची मागील बाजूची काच फोडली. चारचाकीमधील 1 लाख 53 हजार रुपयांची रोकड आणि 20 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असलेली सॅक चोरून पोबारा केला. सराफ व्यावसायिक पोरे आणि त्यांचे मित्र शुज खरेदी करून, परत चारचाकी गाडीकडे आले. त्यावेळी त्यांना चारचाकीची काच फोडून त्यामधील रोकड आणि लॅपटॉप असेलेली सॅक चोरी नेल्याचे लक्षात आले. या घडल्या प्रकाराची त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावऊन शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून, घडल्या प्रकाराची माहिती घेतली. याबाबतचा गुन्हा दाखल कऊन, भरदिवसा घडलेल्या या प्रकाराची गांभीर्याने दखल घेवून, चोरट्याचा शोध सुऊ केला. याचदरम्यान तपासी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यावेळी त्यांना चारचाकी गाडीची काच फोडून त्यामधील रोकड व लॅपटॉप चोऊन नेणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवऊन पोलिसांनी त्या चोरट्याचा शोध सुऊ केला आहे.