बेडगेत घर फोडून रोकड, दागिने लंपास
सांगली
तालुक्यातील बेडग येथे मंगसूळी रस्त्यावर शुक्रवारी रात्री घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. कौलाऊ घरावर चढून आरसीसी बंगल्यात प्रवेश करत सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने, चार हजारांची रोख रक्कम आणि काही भांडी असा एक लाख, 39 हजार ऊपयांचा मुद्देमाल चोऊन नेला. विशेष म्हणजे चोरी करणाऱ्या चोरट्यांना इतर कोणी पकडू नयेत, यासाठी सदर चोरट्यांनी शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांना बाहेरून कडी लावली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. याबाबत दत्तात्रय उमाजी पाटील (वय 62) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून, घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत घटनास्थळावऊन मिळालेली माहिती अशी, बेडग-मंगसूळी रस्त्यावर दत्तात्रय पाटील हे आपल्या वृध्द पत्नीसह राहण्यास आहेत. त्यांच्या जुन्या घरालगत त्यांनी नवीन आरसीसी घर बांधले आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सर्वात आधी दत्तात्रय पाटील यांच्या घराचा दरवाजा वाचविला. सर्व लोक गाढ झोपेत असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी जुन्या कौलावरून घरावरून आरसीसी इमारतीत प्रवेश केला. व घरातील कपाट फोडून त्यातील गंठण, कानातील रिंगा, चैन, अंगठ्या असे सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने आणि काही चांदीची भांडी व चार हजार रूपये रोख रक्कम असा सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने, चार हजार ऊपयांची रोख रक्कम आणि काही चांदीची भांडी असा सुमारे एक लाख, 39 हजारांचा ऐवज चोरून नेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अन्य घरांना बाहेऊन कडी लावल्याचे दिसून आले. रहिवाशांनी एकमेकांना आरडाओरडा करून कडी काढल्या. त्यानंतर पाटील यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घरफोडी दरम्यान, चोरट्यांनीच सदर घरांना बाहेरून कडी लावल्याचा संशय आहे. याबाबत पाटील यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.
सदर घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. ठसे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण केले. याबाबत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक चोरट्यांनी वृध्द दाम्पत्याच्या घराला टार्गेट करून चोरी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, चोरटे स्थानिक असल्याचा संशय आहे. त्यानुसार पोलिसांची विविध पथके चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहे. रहिवाशांना घरात कोंडून घरफोडी करत लाखोंचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडल्याने बेडगसह परिसरात खळबळ उडाली आहे.
सुटकेस, कपडे कॅनॉलवर
दरम्यान, चोरट्यांनी सदर चोरी केल्यानंतर कपड्यांनी भरलेली एक सुटकेसही चोरून नेली होती. पाटील यांच्या घराजवळ काही अंतरावर असलेल्या कॅनॉलजवळ चोरट्यांनी सुटकेस उघडली. मात्र, त्यामध्ये काहीच मौल्यवान ऐवज सापडले नसल्याने चोरट्यांनी सुटकेस व कपडे कॅनॉलवरच टाकून देऊन पोबारा केला. याशिवाय परिसरात अन्य चार ते पाच घरांमध्येही चोरीचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात होते. मात्र, त्याबाबत पोलिसात तक्रारी नव्हत्या.
मंगसूळी रस्त्यावर वारंवार चोऱ्या
दरम्यान, बेडग गावातील निर्मनूष्य आणि कमी प्रमाणातील वस्तीचे ठिकाण म्हणजे मंगसूळी रोड आहे. सदर परिसरात गेल्या काही वर्षांपासून वारंवार घरफोडीच्या घटना घडत आहेत. या रस्त्यावऊनच कर्नाटक सीमा भागात जाण्याचा मार्ग असल्याने कर्नाटकातील काही चोरट्यांच्या टोळ्याही या भागात चोऱ्या करीत असल्याचा संशय आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.