For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Crime News: रोकड कोल्हापुरात, ट्रॅक्टर आजाऱ्याला अन् चोरटे गोव्याला, कसिनोत उधळले 12 लाख

04:14 PM Jun 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
crime news  रोकड कोल्हापुरात  ट्रॅक्टर आजाऱ्याला अन् चोरटे गोव्याला  कसिनोत उधळले 12 लाख
Advertisement

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शिताफीने तपास करुन चोरट्यांना जेरबंद केले

Advertisement

By : आशिष आडिवरेकर

कोल्हापूर : गांधीनगर येथील हवालाची १ कोटी ७८ लाख रुपयांची रोकड लंपास करुन चोरट्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. रोकडमध्ये ट्रॅकिंगसाठी बसविण्यात आलेला ट्रॅकर बंडलामधून काढून तो आजऱ्याला जाणाऱ्या एसटीमध्ये ठेवला. तर पाचही चोरटे रोकड घेवून मंगळवार पेठेत आले.

Advertisement

मंगळवार पेठेतील एका पडक्या घरात रोकड ठेवून तिघेजण गोव्यात तर अन्य दोघे जण कोल्हापुरातच मौजमजा करत थांबले. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शिताफीने तपास करुन चोरट्यांना जेरबंद केले, तसेच लुटीतील सर्व रोकडही जप्त केली.

रिक्षाचालक, प्लेअर ते फरशी फिटींग

योगेश किरण पडळकर (वय २० रा. लक्षतीर्थ वसाहत) हा फरशी फिटींगचे काम करतो. तर सम्राट संजय शेळके (वय २४ रा. लक्षतीर्थ वसाहत) हा फुटबॉल प्लेजर असून, तो सध्या रिक्षा चालविण्याचे काम करतो. तर स्वयंम सचिन सावंत (वय १९ रा. बुधवार पेठ) हा काहीही काम धंदा करत नसून, त्याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. तर स्वरुप संजय शेळके (वय ३० रा. लक्षतीर्थ वसाहत) हा गुडलक स्टेशनरीमध्ये कामास आहे.

प्लास्टिकच्या पोत्यात रक्कम

गांधीनगर येवून ही रक्कम बेळगांवला जाणार होती. एका टेम्पोमध्ये ३ पोत्यांमध्ये भरून १ कोटी ७८ लाख रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती. यासाठी ५ लाखाचे एक बंडल तयार करण्यात आले होते. जवळपास ३५ हून अधिक बंडलामध्ये ही दोन दिवसांत १२ लाखांची मौजमजा कोट्यवधी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारल्यानंतर अल्पवयीन मुलासह स्वयम सावंत आणि योगेश पडळकर हे तिघे शनिवारी रात्री गोव्याला गेले. तिघांनीही ट्रॅव्हल्समधून गोव्याला जाणे पसंत केले. या ठिकाणी तिघांनी २४ तासामध्ये तब्बल १० लाख रुपये कॅसिनोमध्ये उडवले.

दोन लाख रुपयांची मौजमजा

यामध्ये कपडे खरेदी, मोठ मोठ्या हॉटेलमध्ये राहणे असे शौक पूर्ण करुन घेतले. रक्कम होती. ५००, २०० आणि १०० अशा नोटांमध्येही रक्कम जमा करण्यात आली होती. ट्रॅकर आजऱ्यात शनिवारी पहाटे चोरी केल्यानंतर चौघेही दुचाकीवरुन मुडशिंगीच्या माळावर आले.

या ठिकाणी त्यांनी नोटांच्या बंडलावर असणारा ट्रॅकर काढून टाकला. हा ट्रॅकर घेवून दोघे जण मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. त्यांनी आजऱ्याला जाणाऱ्या एका एसटीमध्ये बॅगेत हा ट्रॅटॅकर ठेवला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हा फंडा वापरला.

एका खोलीत ठेवली रक्कम

चोरलेले पैशांचे पोते घेवून चौघेजण मंगळवार पेठेत आले. वारे वसाहत येथे स्वयंम सावंत याचे एका खोलीचे घर आहे. या घरामध्ये त्यांनी ही रक्कम ठेवली होती. यानंतर पाचही जण आपआपल्या कामाला निघून गेले. चोरीची रक्कमही दुचाकीवरुन नेली होती.

कर्मचारीस निघाला टिप्सर

गणेश टॉकीजच्या पिछाडीस असलेल्या गोडावूनमधील एका टेम्पोच्या डॅशबोर्डमधील कप्यात पैसे ठेवल्याची माहिती स्वरुप शेळके याला होती. त्याने याची माहिती त्याच्या इतर साथीदारांना दिली. त्यानुसार इतर चौघांनी दोन दुचाकीवरून जाऊन गुडलक स्टेशनरीच्या गोडाऊनचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर टेम्पोच्या काचा फोडून पैशांचे पोते घेऊन निघून गेले. चोरी करायला जाताना ते एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले.

अल्पवयिनच्या घरात बसुन चोरीचा कट

सम्राट शेळके याचा भाऊ स्वरूप हा गुडलक स्टेशनरीमध्ये गेल्या दोन वर्षापासून कामाला होता. दिवसभर आलेले पैसे कुठे ठेवले जातात याची त्याला माहिती होती. तीन महिन्यापूर्वी राजेंद्रनगर येथे अल्पवयीन मित्राच्या घरात बसून पाच जणांनी गुडलक स्टेशनरीमध्ये चोरी करण्याचा कट रचला होता. तीन महिन्यापासून हे पाच जण रक्कमेवर डल्ला

Advertisement
Tags :

.